सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयात  गुलाब पुष्प देऊन विध्यार्थ्यांचे स्वागत

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन :आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 3/8/2026

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च शंकरनगर अकलूज महाविद्यालयात प्रथम वर्ष पदविका  विध्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. 

त्यानिमित्त ३ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारंभी सहकार महर्षि व आक्कासाहेब यांच्या प्रतिमा पूजन झाले.  प्रा.झंजे एस. एस. यांनी प्रास्ताविक केले.पदविका प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांची ओळख करून दिली.

प्रवेशित विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे  यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की पदविका शिक्षण हे केवळ परीक्षेत चांगले गुण मिळवण्यापुरते मर्यादित नसून तुमच्या मधील तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक कौशल्य, शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण विकसित करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्याचबरोबर नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील,  महाविद्यालयीन विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, कारखान्याचे सेक्रेटरी व महाविद्यालयाच्या ट्रस्टचे सचिव  सुहास रघुनाथ यादव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी शुभेच्छा दिल्या. समन्वयक प्रा. धायगोंडे एन. सी.  यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदविका प्रथम वर्ष विभागातील सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.