🔰 “Good Morning” पेक्षा पुढचं पाऊल,

 🔰 “Good Morning” पेक्षा पुढचं पाऊल, 


वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 6/8/2026 :

आपण रोज सकाळी अनेकांना “Good Morning” असा संदेश पाठवतो. तो पाठवल्यावर क्षणभर समाधानही मिळतं, आपलं कर्तव्य पार पाडल्या सारखं वाटतं. पण खरंच त्या व्यक्तीची सकाळ किंवा संपूर्ण दिवस त्यामुळे चांगला जातो का, याचा कधी विचार केला आहे का? किंवा हे प्रत्यक्ष तपासून पाहिलं आहे का?

आज प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या गोष्टींनी व्यापलेली आहे. कामाचा ताण, आर्थिक चिंता, नात्यांमधले गुंते, आरोग्याच्या समस्या. बाहेरून हसणारा माणूसही आतून खूप काही सहन करत असतो. अशा वेळी केवळ “Good Morning” हा शब्द गोड असला तरी अपुरा ठरतो.

याऐवजी आपण जर एवढंच विचारलं. “तुला काही मदत हवी आहे का?” एक प्रश्न जो त्या व्यक्तीचा दिवस बदलू शकतो.  “काही अडचण असेल तर सांग, मार्गदर्शन हवं असेल तर मी आहे”. तर त्या व्यक्तीच्या मनावर त्याचा खोल परिणाम होऊ शकतो. कारण माणसाला सर्वात जास्त गरज असते ती समजून घेणाऱ्या माणसाची. कोणी तरी आपल्यासाठी वेळ काढतो, आपली विचारपूस करतो, ही भावना माणसाला मानसिक जगण्याचं अधिक बळ देते.

कदाचित आपण सगळ्यांच्या समस्या सोडवू शकणार नाही. पण ऐकून घेणं, धीर देणं, योग्य दिशा दाखवणं हे तरी नक्कीच करू शकतो. अशा छोट्या पण प्रामाणिक विचारण्यांमुळे अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो.

म्हणूनच असं वाटतं की “Good Morning” पेक्षा जर आपली माणुसकी पुढे आली, तर जगातील किमान ९९ टक्के लोक अधिक समाधानी, शांत आणि आनंदी आयुष्य नक्कीच जगू शकतील.

विजया कदम 

  मुंबई कल्याण पूर्व

   ✍️ संकलन : प्रविण सरवदे, कराड

====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या