मनाची शुद्धता

 


मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 6/8/2026 :

आपल्या प्रत्येकाच्या वागण्या-बोलण्यात एक वेगळाच ताठा किंवा अवाजवी स्वाभिमान असतो. मी म्हणतो तेच अंतिम, तेच सत्य असा बहुतेकांचा अट्टाहास असतो; पण असे नेहमीच चालत नाही. दुसऱ्याच्या मतांचाही आदरपूर्वक विचार करणे तितकेच संयुक्तिक असते.

_'मोडेन पण वाकणार नाही'_ असा स्वभाव असेल, तर जास्त काळ कोणाशीच पटत नाही आणि शेवटी एकटे पडण्याची वेळ येते. काही विशिष्ट प्रसंगी हे ठीक असले, तरी रोजच्या वागण्यात लवचिकता असणे अत्यंत आवश्यक असते.

प्रसंगानुरूप व परिस्थितीनुसार आपली मते बदलतात आणि ती बदलावीही लागतात. प्रत्येक वेळी फार तत्त्वानेच वागून चालत नाही; कधी समोरच्या व्यक्तीला किंवा घरातल्यांना आनंद मिळावा म्हणूनही स्वतःमध्ये बदल करावा लागतो.

आजचा संकल्प

वैचारिक पातळीवर जशी लवचिकता गरजेची असते, तशीच ती मानसिक व भावनिक पातळीवरही ठेवण्याची तयारी ठेवू आणि येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाचे सकारात्मक भावाने स्वागत करू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या