◼️मुलांना घालून-पाडून बोलू नका,
◼️माफ करायला शिका,
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 13/8/2026 :
*तब्येतीच्या बाबतीत नंतर बघू चालत नाही :* एका वयानंतर आपली तब्येत हे आपलं प्राधान्य असलंच पाहिजे. दुखलं खुपलं तर नंतर बघू असं म्हणून दुखणं वाढायची वाट बघू नका. 'काही नाही, किरकोळ आहे' हे डॉक्टरला सांगूदे. आपलं आपण ठरवायचं नाही
*बचत करा, पण जगायचं विसरून नको :* पैसा साठवायला हवा, उधळपट्टी करणं बरोबर नाही, हे मान्यच. पण आयुष्यभर कष्ट करून कमावलेला पैसा स्वतःच्या आनंदासाठी खर्च करण्यात काही गैर नाही. त्यामुळे बचत नक्की करा, पण बचत करायची म्हणून या वयात स्वतःचं मन मारू नका. एखाद्या वेळी हॉटेलमध्ये जाऊन आवडीचं खा. चांगला सिनेमा आला असेल तर थिएटरला जाऊन बघा.
*मैत्रीलाही मेटेनन्स लागतो :* आपले मित्र किंवा मैत्रिणी यांना जपणं हे आपलं काम आहे. गाडीला जसं सव्हिसिंग लागतं तसा मैत्रीचा मेंटेनन्सही महत्त्वाचा आहे. मित्र मैत्रिणींशी संपर्क ठेवा. भेटा. गप्पा मारा. जवळपास सहलीला जा. एकटेपणा जातो.
*इगो विसरा :* मुलं-मुली, सुना-जावई, नातवंडं यांच्याशी तुमचे संबंध प्रेमाचे आणि निकोप राहायला हवे असतील तर इगो बाजूला ठेवा. सर्वच विषयांवर सर्वांचं एकमत होणार नाही. एकमत होत नाही म्हणजे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा नाही, असा अर्थ लावू नका.
*प्रवास करा, फिरा, जग बघा :* जग बघा म्हणजे परदेश प्रवासच करा असं नाही. शरीर ठणठणीत आहे तोपर्यंत प्रवास करा. आपला देश बघा. आजूबाजूची माणसं बघा. त्यामुळे चारांच्या कक्षा रुंदावतात.
*मुलांना घालून-पाडून बोलू नका :* तुमच्या मुलांनी वयाच्या अठराव्या वर्षी केलेल्या एखाद्या क्षुल्लक चुकीवरून त्यांना आता बोलू नका. तुमचं वय वाढलं, तुम्ही शहाणे झालात तशी मुलंही शहाणी झाली असतीलच मुलांना तुमचं प्रेम दिसू द्या.
*माफ करायला शिका :* कुटुंब, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्याशी असलेले जुने वाद, मतभेद विसरा, माफ करायला शिका. सोडून द्या.
*सतत सल्ला देऊ नका :* कुणी विचारलं तर जरूर सल्ला द्या; पण मागितलेलं नसताना अजिबात सल्ला द्यायला जाऊ नका. त्यामुळे आपणच आपली किंमत कमी करून घेण्याची शक्यता असते हे विसरू नका.
संकलन : प्रवीण सरवदे, कराड
====================

0 टिप्पण्या