विचारधारा

 


विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 14/8/2026 :

सौंदर्य हे प्रत्येकालाच आवडते. उंची-पुरी, गोरीपान, नाकी-डोळी नीटस असणारी व्यक्ती आपल्याला पाहताक्षणी मनापासून आवडते; आपली नजर वारंवार तिच्याकडे जाते आणि अशा व्यक्तींबद्दल सर्वांनाच आकर्षण वाटते.

सौंदर्य हे सजीव-निर्जीव अशा सर्व गोष्टींमध्ये दडलेले असते. हस्तअक्षर देखणे असते, आकृत्या सुंदर असतात, वास्तू आकर्षक असते, रस्ते छान असतात, देखणी बैलजोडी असते; अगदी गाढवेसुद्धा अटकर बांध्याची असतात.

मुलांनो, मुख्य म्हणजे सौंदर्य हे आपल्या पाहणाऱ्या नजरेत असावे लागते. कोणत्याही गोष्टीतील, व्यक्तीतील किंवा वस्तूमधील चांगले ते नेमके आपल्याला दिसले पाहिजे. मनात सुंदर भाव असतील, तर हे संपूर्ण जग सुंदर दिसते; म्हणूनच सौंदर्य हे आपल्या मनात व नजरेत रुजवा.

आपल्या मनाचे सौंदर्य वाढवा, ते जपा आणि जीवनातील खऱ्या सौंदर्याचा आनंद घ्या!

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या