दीप आमावस्यानिमित्त पाटणेवाडी फलटण येथे स्वरसंध्या ग्रुपची सुश्राव्य भजन सेवा संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
(श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे येथून भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे)
दिनांक 13/8/2026 : पाटणेवाडी फलटण येथील श्री भैरवनाथ मंदिरात दीप आमावस्यानिमित्त श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे तालुका बारामती जिल्हा पुणे चे मुख्य पुजारी व विद्यमान ट्रस्टी मोहन मुरलीधर भांडवलकर यांच्या स्वर संध्या ग्रुप च्या वतीने बुधवार दिनांक 12/8/2026 रोजी रात्री सुश्राव्य भजन सेवा संपन्न झाली. श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे येथील सर्व सुयोग्य व्यवस्थापन सांभाळत बाहेर गावी धार्मिक सेवा बजावण्यासाठी मोहन भांडवलकर हे सदैव तत्पर राहतात.
पाटणेवाडी फलटण येथील भजन सेवेप्रसंगी गायन व हार्मोनियम स्वतः मोहन मुरलीधर भांडवलकर करीत असताना ऋषी बर्गे यांनी तबला साथ दिली तर साथसंगत तेजस महाराज कदम निंबुत, किरण पवार सोमेश्वरनगर तसेच स्थानिक भजनी मंडळ यांचे सहकार्य लाभले. दर अमावस्येला पाटणे वाडी फलटण या ठिकाणी भंडाऱ्याच्या कार्यक्रमानिमित्त भजन सेवा आणि महाप्रसाद वाटप होत असते. याप्रसंगी परिसरातील भाविक भक्त ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या