मनाची शुद्धता

 


मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 14/8/2026 :

आपल्याला झालेली जखम मनाची असो वा शरीराची, ती कशामुळे झाली व त्याला जबाबदार कोण याची आपल्याला पूर्ण कल्पना असेल, तर ती लवकर बरी होणे जास्त सोपे जाते.

विशेषतः तुम्ही स्वतः त्या गोष्टीला जबाबदार असाल, तर त्यावर योग्य औषधोपचार करणे अधिक सोपे जाते. अशा वेळी आपल्या आतील कणखरपणामुळे मानसिक जखमा लवकर भरून येतात.

कोणी आपल्याला दुखावले असेल व आपण त्यामागील मूळ कारण समजावून घेतले, तर त्या नकारात्मक मानसिकतेतून आपण सहज बाहेर पडू शकतो. कदाचित आपलीही चूक असू शकते; ती वेळेवर लक्षात आली तर ती दुरुस्त करणे अजून सोयीस्कर होते.

आजचा संकल्प

चूक आपली असो वा दुसऱ्याची, वेदना मानसिक असो वा शारीरिक... त्या कमी करण्यासाठी आपण स्वतः सतत प्रयत्नशील राहू व त्यातून यशस्वीपणे बाहेर पडू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या