विचारधारा

 


विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 4/8/2026 :

आपण बातम्या पाहतो किंवा वृत्तपत्रे वाचतो; त्यामध्ये सहलीला गेलेल्या लोकांच्या अपघातांबद्दल वाचतो. क्वचितच ते निव्वळ अपघाताने घडलेले असतात, पण अनेकदा ते उत्साहाच्या भरात आपणच केलेल्या चुकांचा परिणाम असतात.

वाहत्या पाण्यात वाहून जाणे, घसरड्या खडकांवरून पडून जखमी होणे, दरीत घसरणे वगैरे प्रकार अनेकदा आपल्या निष्काळजीपणामुळे घडतात. आपल्याला वाचवण्यासाठी जे आपत्ती व्यवस्थापन पथक येते, त्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून आपला शोध घ्यावा लागतो.

मुलांनो, धाडसी व साहसी तरुण आपल्याला वाचवण्यासाठी दरीत उतरतात किंवा वाहत्या पाण्यात उड्या मारतात, तेव्हा त्यांनाही जीव असतोच ना? त्यांचीही मुले, पत्नी, आई-वडील घरी वाट पाहत असतात ना? आपल्या निष्काळजीपणाची शिक्षा ते विनाकारण का भोगेतील?

स्वतःच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊ आणि इतरांच्या जिवाचा व सुरक्षेचाही आदर करू!

सौ. स्नेहलता स. जगताप

==================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या