विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 7/8/2026 :
आपण रात्री झोपेत अनेकदा स्वप्ने पाहतो. ही रात्रीची स्वप्ने कधी जशीच्या तशी आठवतात, तर कधी काहीच आठवत नाहीत; अशा वेळी आपली थोडी चिडचिड होते, पण इलाज नसतो.
आपले माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ व 'मिसाईल मॅन' डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या मते... _"स्वप्ने नक्की पाहा, पण ती उघड्या डोळ्यांनी पाहा आणि ती सत्यात उतरवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहा."
मुलांनो, तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी केवळ तुमचीच असते. ती जबाबदारी टाळणे जसे अयोग्य आहे, तसेच ती दुसऱ्यावर ढकलून देणेही चालणार नाही. मोठी स्वप्ने पाहा व ती पूर्ण करण्यासाठी अविरत प्रयत्न करा.
"Low ambition is a crime!"_ (कमी ध्येय ठेवणे हा गुन्हा आहे) हे नेहमी लक्षात ठेवा व आपले ध्येय निश्चित करा.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या