मुस्तफा वहाबुद्दीन सय्यदसाहेब यांचे अकस्मात निधन

 


मुस्तफा वहाबुद्दीन सय्यदसाहेब यांचे अकस्मात निधन

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

 अकलूज दिनांक 17/8/2026 :

मुस्तफा वहाबुद्दीन सय्यद साहेब( वय ७० वर्षे) यांचे रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शंकरनगर- अकलूज (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) येथे राहते घरी अकस्मात निधन झाले. शंकरनगर अकलूज येथून त्यांचे पार्थिव त्यांचे मूळ गाव जवळा, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर येथे नेण्यात येऊन त्या ठिकाणी विधिपूर्वक दफनविधी करण्यात आला. त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई असा परिवार आहे. सय्यदसाहेब यांच्या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सहकार महर्षि कै. शंकरराव मोहिते पाटील यांचे ड्रायव्हर सरदार शेख यांचे ते जावई होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या