विचारधारा

 


विचारधारा

🇮🇳भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🇮🇳 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 15/8/2026 :

१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश पारतंत्र्यातून पूर्णपणे मुक्त झाला आणि ब्रिटिशांना आपल्या देशातून परत जावे लागले. आपण स्वतंत्र झालो, पण त्यासाठी हजारो ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांनी व स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले.

स्वातंत्र्यसंग्रामात आहुती देणाऱ्या वीर सुपुत्रांची यादी फार मोठी आहे; त्यांत अनेकांची नावेही इतिहासात नोंदली गेली नाहीत. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाच्या सीमा सुरक्षित राखण्याची खडतर जबाबदारी आपल्या भारतीय सैन्यदलाने समर्थपणे पेलली.

मुलांनो, आजवर भारतीय सैन्यदलातील असंख्य जवानांनी देशरक्षणासाठी वीरमरण पत्करले आहे. त्यांच्या कुटुंबीयांचा त्यागही फार मोठा आहे; त्यांना भक्कम आधार देणे व सन्मानाची वागणूक देणे हे प्रत्येक भारतीयाचे आद्यकर्तव्य आहे.

आपला तिरंगा आज ताठ मानेने फडकत आहे तो केवळ आपल्या सैनिकांच्या बलिदानावर; आपण त्यांना मनोभावे कृतज्ञतापूर्वक वंदन करूया!

जय हिंद!🇮🇳

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या