🟣 श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे येथे श्रावण मासानिमित्त भक्तातर्फे "आरती प्रसाद वाटप" शुभारंभ
🟡 पहिला अभिषेक, पूजा, आरती प्रसाद वाटप प्रथम मानकरी भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे
वृत्त एकसत्ता न्यूज
मोहन मुरलीधर भांडवलकर यांज कडून
सोमेश्वर करंजे, दिनांक 13/8/2026 : श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे (तालुका बारामती, जिल्हा पुणे) येथे दैनंदिन आरती प्रसाद उपस्थित भाविकांना प्रसाद वाटपाचे कार्य देवस्थान ट्रस्टच्या वतीने अखंडपणे सुरू आहेच. त्याचबरोबर श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे येथील मुख्य पुजारी व विद्यमान ट्रस्टी मोहन मुरलीधर भांडवलकर यांच्या संकल्पनेतून यंदापासून प्रथमच श्रावण मासातील दैनंदिन दुपारी 12 वाजता आरती प्रसाद वाटपाची परंपरा भाविकांमधून सुरू करण्यात येत आहे.
त्यानुसार यावर्षी श्रावण मासातील पहिल्या दिवसाच्या पहिल्या अभिषेक पूजा आणि आरती प्रसाद वाटपाचा पहिला मान अकलूज वैभव आणि वृत्त एकसताचे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार, शिवभक्त भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे (संग्रामनगर अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र राज्य) यांना लाभला आहे.
"बालपणापासूनच्या भक्तीमार्गातील घडत असलेल्या अल्पसेवेतून असे भक्ती मार्गातील योगायोगाचे अनेक समाधान युक्त अनपेक्षित क्षण आज पर्यंत अनुभवास आलेले आहेत, याबाबत खरंच मी भाग्यवंत आहे. यापुढेही असे क्षण अनपेक्षित पणे नक्कीच येत राहतील असा ठाम विश्वास या निमित्ताने भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी व्यक्त केला".


0 टिप्पण्या