विचारधारा

 


विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 10/8/2026 :

नम्रता व विनयशीलता हे गुण आपल्या प्रत्येकाच्या अंगी असणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या वागण्या-बोलण्यातील लीनता समोरच्या व्यक्तीला मनापासून भावते; अगदी अनोळखी व्यक्तीसुद्धा त्यामुळे आपलीशी होते.

आपल्यातील हे सद्गुण आपल्याला तर आनंद देतातच, पण त्याबरोबरच आपल्या सभोवताली वावरणाऱ्या लोकांनाही आनंद देतात; त्यामुळे वाद, तंटे व भांडणे या गोष्टींना कधी संधीच मिळत नाही.

मुलांनो, अहंकार कधीच चांगला नसतो. कोणत्याही विषयावर ताठर भूमिका घेणे हे तोट्याचे ठरते; लवचिक भूमिका घेणे कधीही चांगले. प्रथम क्रमांकाने विजयी झालात तरी सुवर्णपदक स्वीकारताना मान झुकवावीच लागते, होय ना?

आपल्या अंगी असणाऱ्या या विनयशीलतेमुळेच समाजात आपली एक वेगळी नि आदरयुक्त ओळख निर्माण होते.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या