विचारधारा

 


विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 12/8/2026 :

शाळेत आपण धडे शिकलो की प्रश्नांची उत्तरे पुस्तकांत शोधून लिहितो. प्रत्येक प्रश्नाला तिथे उत्तर असतेच आणि परीक्षेत ते बरोबर लिहिले की चांगले गुण मिळतात.

पण व्यवहारी जीवनात मात्र तसे नसते. काही वेळा एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत असले, तरी ते लगेच द्यायचे नसते; तिथे शांत बसणेच अधिक योग्य ठरते आणि त्यातूनच तुमचा समजूतदारपणा दिसून येतो.

मुलांनो, 'अरेला कारे करायचे नाही' असे मोठे लोक नेहमी सांगतात. यामागे हेतू हाच असतो की, समोरची व्यक्ती कितीही चिडलेली असली, तरी आपण पूर्णपणे शांत राहायचे. आपल्या शांत राहण्याने ती व्यक्तीसुद्धा नरम पडते व पुढील मोठे वाद टळतात.

जर शांत राहण्याने पुढील अनर्थ टळणार असेल, तर अशा प्रसंगी क्षुल्लक प्रश्नांना उत्तर देऊ नका.

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या