विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 13/8/2026 :
कधी कधी आपले कोणाशी तरी वैचारिक मतभेद होतात. कुटुंबातील व्यक्ती असतील किंवा मित्रपरिवार, आपापसात 'तुझे-माझे' होतेच. कधी वाद थोडक्यात मिटतो, तर कधी उगीचच ताणला जातो.
'अति ताणले की तुटते' हे आपणा सर्वांना माहीत आहे; त्यामुळे एकाने ताणले तरी दुसऱ्याने ते सैल सोडायचे असते. शब्दाने शब्द वाढवण्यापेक्षा शांत बसणेच योग्य ठरते. एकाचा राग शांत झाला की मगच दुसऱ्याने त्यावर संवाद साधावा.
मुलांनो, तापत्या तव्यावर पाणी टाकले तर त्याचे थेंब तडतड उडतात; पण तवा थंड झाला की तेच पाणी स्थिर राहते. प्रत्येकाला आपल्या रागावर संयम ठेवता आला पाहिजे. गरम डोक्याने मने दुरावतात; ते टाळायचे असेल तर संयम अत्यंत महत्त्वाचा आहे.
कोणाशीही फटकळपणे बोलण्यापेक्षा समजूतदारपणे बोलू व आपुलकीचे संबंध जपू.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या