विलासचंद्र एम. मेहता आयटीआय दहिगाव चे दोन विद्यार्थी तालुक्यात पहिले
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 13/8/2026 :
जुलै २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत दहिगाव येथील विलासचंद्र एम. मेहता आयटीआयचा निकाल ९३.१८% लागला असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य गजेश जगताप यांनी दिली. शिल्पकारागीर योजनेअंतर्गत या संस्थेत इलेक्ट्रिशन व्यवसाय ट्रेड मधील प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष तसेच फिटर प्रथम वर्ष असे एकूण ४४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी प्रतीक संजय इंगळे ९२.१७ टक्के मिळवून प्रथम वर्षात तालुक्यात प्रथम क्रमांक व अजित बबन मोरे ९५.५० टक्के मिळवून द्वितीय वर्षात माळशिरस तालुक्यात प्रथम क्रमांक आला आहे. रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर चे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल रतनचंद दोशी, महावीर स्वामी मंदिर चे कोषाध्यक्ष अमृतलाल गांधी, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी चे सचिव प्रमोद अनंतलाल दोशी, उपाध्यक्ष विशाल गांधी, आयटीआयचे चेअरपर्सन अमित गांधी, इंग्लिश स्कूलचे चेअरपर्सन रोनक चंकेश्वरा, निश्चल होरा, प्राचार्य गजेश जगताप, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
0 टिप्पण्या