मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 10/8/2026 :
कोणतेही काम करायला घेतले की ते पूर्ण तरी होते किंवा अर्धवट राहते. काम पूर्ण झाल्यावर एक वेगळेच समाधान व आनंद मिळतो; मात्र काम अपूर्ण राहिले तर आपण नाराज होतो.
योग्य दिशेने योग्य प्रयत्न करणे, अपयश आल्यास पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे आणि कामातील त्रुटी शोधून काढणे हे अत्यंत आवश्यक असते. नाराज होऊन प्रयत्न करणे सोडून दिले, तर आपले काम कधीच पूर्ण होणार नाही.
कसल्याही कठीण परिस्थितीत काम पूर्ण करण्याची जिद्द ठेवली व अपयशाने खचून न जाता उलट जास्त ताकतीने व गतीने काम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, तर यश नक्कीच मिळते.
आजचा संकल्प
हाती घेतलेले काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणारच असा ठाम निश्चय करून सतत प्रयत्नशील राहू व आपला आत्मविश्वास वाढवू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या