मनाची शुद्धता
🇮🇳भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🇮🇳
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 15/8/2026 :
आज १५ ऑगस्ट! आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र होऊन ७९ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज म्हणून आपला तिरंगा आजच्या दिवशी ८० व्या वेळी डौलाने फडकला.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला. भारताची महान राज्यघटना लिहिली गेली, ती सर्वसंमतीने मान्य झाली व आपला देश प्रजासत्ताक झाला; त्यामुळे प्रत्येक नागरिकाला लोकशाहीचे सर्व अधिकार व मूलभूत हक्क मिळाले.
आज आपण स्वतंत्र भारताच्या ८० व्या वर्षात पदार्पण करत आहोत. आपल्यापैकी अनेकांना आपले हक्क माहीत नाहीत, तर काहींना आपली कर्तव्ये माहीत नाहीत; ती दोन्ही नीट समजून घेण्याची आज नितांत गरज आहे.
आजचा संकल्प
स्वतंत्र भारताचे जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वप्रथम आपली कर्तव्ये समजून घेऊ. कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडली की हक्क न मागताही मिळतात, हे लक्षात ठेवू व देशाप्रति आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे बजावू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या