मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 21/8/2026 :
आपल्याला नेहमीच मौल्यवान गोष्टींचे मोठे आकर्षण असते; विशेषतः दुसऱ्याकडे जे मौल्यवान आहे ते आपल्याकडेही असावे असे वाटते. मग तो एखादा महागडा पेन असेल, मोबाईल असेल किंवा एखादा दागिना.
सोने-चांदी, हिरे-माणके असे मौल्यवान दागदागिने मिळवण्यासाठी भरपूर पैसे लागतात; ते कमावण्यासाठी कामधंदा, व्यवसाय किंवा नोकरी करावी लागते आणि चांगली नोकरी मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. म्हणजेच या सर्वांच्या मुळाशी 'प्रयत्न' हेच आहेत, हे आपल्या सहज लक्षात आले असेल.
'प्रयत्नांती परमेश्वर' असे जे आपण म्हणतो, त्यात १००% तथ्य आहे. प्रामाणिक प्रयत्न केल्याशिवाय आयुष्यात काहीच मिळत नाही. कोणतीही नवीन गोष्ट शिकायची म्हटले की चुकत-माकत, नियमित सरावाने व प्रयत्नानेच ती जमू लागते. त्यात प्रावीण्य मिळवायचे असेल तर अपार प्रयत्नच करावे लागतात.
आजचा संकल्प
प्रयत्न करण्याची जिद्द हेच आपल्याकडील सर्वांत मौल्यवान रत्न आहे. आपल्या ध्येयाप्रती पोहोचण्यासाठी मनापासून सातत्यपूर्ण प्रयत्न करू आणि प्रयत्नांच्या जोरावरच जीवनात यशस्वी होऊ.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या