⏹️ कुठलाही आजार आपल्याला का होतो?

 ⏹️  कुठलाही आजार आपल्याला का होतो? 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 11/8/2026 :

कुठलाही आजार आपल्याला का होतो? तर त्याचे सहज सोपे उत्तर आहे, तुम्ही स्विकारल्यामुळे. आपल्या शरीरात पाण्यावर तरंगण्याची नैसर्गिक शक्ती आहे. पण तरीही माणूस पाण्यात बुडून मरतो. याला काय म्हणाल? आपल्या मनाने अतिशय खंबीरपणे स्विकारले की मला पोहायला येत नाही, आणि कोणालाही पोहायला येत नाही ही अंधश्रद्धा आहे. 

हत्ती किती जड आहे तोही पोहतो. कारण त्याने ठरवलेले नाही. त्याला माहीतच आहे, तो पाण्यावर तरणार आहे. सापाला तर हात पाय नसतात, तोही पाण्यात पोहतो. म्हणजे हात पाय हलवले तरच आपण पाण्यावर तरंगू शकतो, हाही गैरसमजच आहे. जी माणसं पाण्यात बुडून मरतात, त्यांचे शरीर काही वेळाने पाण्यावर तरंगायला लागते. या प्रमाणेच आपल्यात प्रतिकारशक्ती आहे. ती आपल्याला कसलाच आजार होवू नये, यासाठी सतत काम करत असते. तिला मनापासून ताकदीने मान्य करा, आणि वापरा हेच खरे शरीर शास्त्र आहे. मेडीकल सायन्स ही शक्ती तुमच्यात नसेल तर काहीच करू शकत नाही. ताप आल्यावर, सर्दी झाल्यावर, शिंक आल्यावर कसलाही आजार झाल्यावर थोडं थांबा. तुमच्यातील प्रतिकारशक्तीला काम करू द्या. अशा आजारांवर वारेमाप खर्च करणे शरीरावर अत्याचार आहेत, ही अंधश्रद्धा आहे. शरीरशास्त्रात नैसर्गिक प्रतिकारशक्ती म्हणजे खरे विज्ञान आहे.

आपल्या शरीरातली अर्ध्याहून अधिक आजारांच्या मागे आपलं अज्ञ मन असतं. पण कित्येकदा पेशंटला याची माहीती नसते. डॉक्टरांकडे गेलं आणि उपचार घेतले की तात्पुरतं बरं वाटतं, थोड्या दिवसांनी पुन्हा दुखणं, उफाळून येतं; काय करावं, ते समजत नाही. मन आणि शरीर यांना जोडणारी काही लक्षणे बघूया.

एखाद्या गोष्टीची जबरदस्त भिती किंवा चिंता वाटली की घशाला कोरड पडते. परिक्षेचा किंवा अजून कसला तणाव असेल तर पोटात गोळा येतो. समोर एखादा अपघात किंवा दुर्घटना पाहीली की हातापायातली शक्ती गळून जाते. याविपरीत सतत हसतमुख असणारी व्यक्ती नेहमी क्वचितच आजारी पडते. तर हे सिद्ध होते की, शरीरातल्या आंतरिक क्रियांवर अज्ञात मनाची सत्ता चालते. जसं की, समोर मातीचे कण उडाले की सेकंदाच्या दहाव्या भागात लगेच पापण्या मिटतात. अज्ञात मन शक्तीशाली आहे, पण तो एखाद्या सेनापती सारखं काम करतो. त्याच्यावर सत्ता चालते ती फक्त तुमच्या विचारांची. मग तो कितीही ताकतवर असला तरी तो गुलामच. दिलेला आदेश पाळणं एवढचं त्याचं काम. आपण जे काही बोलतो तेच आपले विचार आहेत.

*ब्लडप्रेशर आणि हृदयविकार* : समजा एखादा माणुस नकळत, अशी वाक्ये पुन्हा पुन्हा वापरत असेल, जसं की- त्याला बघितलं की माझं रक्तचं खवळतं, ह्याच्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं आणि हे बदलले, माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते. क्वचित अशी वाक्ये वापरली गेली, तर हरकत नाही. पण पुन्हा पुन्हा हेच बोलल्यास आणि ते सुप्त मनात गेल्यास त्याचा विपरीत परीणाम रक्ताभिसरणावर नक्कीच होतो. डॉक्टरकडे गेल्यावर औषध उपचाराने काही काळ बरं वाटतं, पण अज्ञात मन त्याचा पिच्छा सोडत नाही. ही सर्व वाक्य सतत तणावात असणार्‍या व्यक्तीच्या सवयीचा भाग बनतात आणि लवकरच त्याला ब्लडप्रेशर आणि मोठ्या स्वरुपाचे हृदयाचे विकार घेरण्यास सुरुवात करतात. थोडक्यात सतत मानसिक तणाव, हताशा आणि निराशा अनुभव करणारा व्यक्तीला हृदयाचे विकार लवकर घेरतात.

*आतड्यांचे विकार* : जो व्यक्ती स्वतःलाच घालून पाडून बोलतो, स्वतःची निंदा करतो, स्वतःला दुबळा समजतो, त्याला छोट्या आतड्यांच्या विकरांची समस्या उदभवते.

*अपचन* : खरतरं मलविसर्जन ही अतिसहज आणि नैसर्गिक क्रिया आहे, तरीही काही जणांना ‘धक्का देण्यासाठी’ कृत्रिम उपायांचा, जसं की एखादे चुर्ण किंवा एखादं औषध ह्यांचा सहारा घ्यावा लागतो. आता ह्याची बरीचशी कारणं आहेत. काही वेळा ह्याचं कारण बाल्यावस्थेत दडलेलं सापडतं. कडक शिस्तीच्या नादात आई वडीलांनी मुलाला एखादी शिक्षा केलेली असते, त्याचा राग त्याच्या मनात असतो. लहान मुलं आईवडीलांवर राग काढु शकत नाही, त्याला त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकावीच लागते. त्यांना विरोध म्हणून ही क्रिया तो रोखून धरतो. ह्या ठिकाणी आई वडील त्याला जबरदस्ती करु शकत नाहीत, हळुहळू तो मोठा होतो. शिस्तीचा बडगाही संपतो, पण आपल्या आतड्यांवरचं नैसर्गीक नियंत्रण तो हरवून बसतो. असं ही बघण्यात येतं की जेव्हा व्यक्ती आर्थिक संकटात सापडते, तेव्हा तिची पचनशक्ती कमजोर झाली होती. जे लोक कंजुष वृत्तीचे असतात, त्यांच्या मध्ये मुळव्याध्याची समस्या जास्त आढळते. छोट्या छोट्या गोष्टींवर एखादी व्यक्ती वारंवार उत्तेजित होते, चिडते, अस्वस्थ होते, त्याचा परीणाम जठर आणि पित्ताशयावर पडतो.

*डोकेदुखी* : आजकाल बहुतांश महिलांना झंडुबाम शिवाय झोप येत नाही. कारण काय असेल? ह्या व्यक्तीला बघितलं की माझं डोकं दुखतं, त्याने माझं खुप डोकं खाल्लं. आमच्या ह्यांच्या समोर कितीही डोकं फोडा काही फायदा नाही. निरंतर, नकळत असं बोलत राहील्याने अज्ञ मनात संदेश पोहचतो की माझ्या डोक्याला दुखायचे आहे. आणि मायग्रेनचा त्रास चालू होतो. डोकेदुखीची अजुनही काही कारणे आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी अप्रिय घटना घडलेली असतेच, पण तिला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा उगाळण्याचा स्वभाव असेल तर डोकेदुखी सुरु होते. तेव्हा असे कटु अनुभव विसरुन जाणेच इष्ट. कधी नकोसे वाटणारे काम, त्रासदायक काम अंगावर येऊन पडते, आणि डोके दुखते. जितके पोस्टपोर्न केले तेवढा त्रास होतो, तेव्हा अशी कामे तात्काळ निपटून काढावीत.

*पाठदुखी* : एखादा व्यक्ती सतत जबाबदारीच्या ओझ्याने वाकुन थकुन गेला असेल, तेव्हा त्याला पाठदुखीला सामोरं जावं लागतं. असह्य वेदना होतात. माने पर्यंतचे स्नायु आखडले जातात. चेहरा मुळ स्थानी न राहता उजवीकडे किंवा डावीकडे कलतो. आता सर्वात महत्वाचे, ह्यावर उपाय काय आहे? आपापले औषधौपचार चालू ठेवा, पण हे रोग शरीरातून समुळ उपटून काढायचे असतील, तर स्वयंसुचना हाच ह्यावरचा एकमेव उपाय आहे. जसं की डोकेदुखीचं उदाहरण घेऊ. तंद्रावस्थेत जाऊन आपल्या अज्ञात मनाला सुचना द्या- आता माझं डोकं एकदम हलकं होत आहे, आता ते अजून शिथील आणि हलकं झालं आहे, डोके दुखण्याचे प्रमाण कमी होत आहे. माझ्या डोक्यात जमा झालेलं अतिरीक्त रक्त आता शरीराच्या इतर भागात सुरळीतपणे पसरत आहे. माझा डोकेदुखीचा त्रास नाहीसा होत आहे. काही क्षणात ही बैचेनी दुर होईल, आणि डोकेदुखी गायब. प्रत्येक रोगासाठी अशा सुचना तयार करुन त्या अज्ञ मनापर्यत पोहचवुन रोगमुक्त होता येते.

भावनांची कोंडी करुन जगू नका. रोग बनून ते शरीराला पोखरतील. राग व्यक्त करा आणि मोकळे व्हा. इथे मला एका महापुरुषाचा दृष्टांत आठवतो. त्यांना राग आल्याक्षणी ते कागद घ्यायचे आणि सविस्तर लिहून काढायचे. मनातले संपुर्ण भाव ओतून रिते व्हायचे. ते कागद दोन चार दिवस तसेच टेबलवर ठेवायचे आणि नंतर जाळून किंवा फाडून टाकायचे. अशा प्रकारे मनातली सारी खळबळ बाहेर काढून टाकता येते. त्यामुळे क्रोधाची भावना नाहीशी होते आणि हलकं हलकं वाटतं. सर्वांना, निरोगी आयुष्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा.

डॉ. प्रवीण कुलकर्णी

HERBAL ENGINEER

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या