🍀 रानभाजी - करांदे 🍀

 


🍀  रानभाजी - करांदे  🍀 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 15/8/2026 :

पावसाळ्यात मिळणारे करांदे आवडीने खाल्ले जातात. कापलेले करांदे राखेत घोळवून पळसाच्या पानात शिजवतात. यात व्हिटॅमीन ए, बी-५, बी-६, थायमिन, नायसिन, रिबोफलाविन, कॅरोनाईट्स इत्यादी घटक असतात. हे घटक कॅन्सर सारख्या आजाराला दूर ठेवतात.

*पाककृती १*

# साहित्य- करांदे धुवुन काप करुन, आपट्याचा पाला, राखाडी, मिठ जाडे असल्यास चांगले.

# कृती- कापलेले करांदे राखे मध्ये घोळवुन पातेल्यात आपट्याचा पाला मध्ये घालून रचावे. टोपाच्या कडेने करांदे बुडे पर्यंत अलगद पाणी टाकावे. आता हे उकळवत ठेवावे. उकळी आली की पाणी काढुन टाकावे. टोपावर झाकण ठेउन टोपाच्या दोन कडांना झाकणा सकट धरुन, उतरते धरुन पाणी काढावे. हे पाणि एकुण दोन वेळा काढावे. तिसर्‍या पाण्यात मिठ घालावे व करांदे शिजवुन घ्यावेत. मग हे पुर्ण गार झाल्यावर स्वच्छ धुवुन खायला घ्यावेत.

# टिप- करांदे हे मातीने भरलेले असतात. त्यामुळे ते स्वच्छ धुवुन घ्यावेत. हे चवीला कडवट असतात. त्यामुळे सगळ्यांनाच आवडतील असे नाही. पण ज्यांना आवडतात ते खूप खातात.

*पाककृती २*

करांदे सुका जवला भाजी (व्हिडियो)

https://youtu.be/CLyXurUuvyQ

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

संदर्भ : इंटरनेट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या