मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 7/8/2026 :
जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम ध्येय निश्चित करणे गरजेचे असते. सर्व बाजूंनी विचार करून योग्य ती दिशा ठरवावी लागते व भरपूर सराव म्हणजेच अपार कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते.
या कष्टाला सातत्य व प्रामाणिक प्रयत्नांची जोड द्यावी लागते. क्वचित प्रसंगी अपयश येते, तेव्हा पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतात; त्यासाठी मनात जिद्द व चिकाटी असावी लागते. प्रसंगी परिस्थितीशी व लोकांशी संघर्ष करावा लागतो.
यशस्वी होणे म्हणजे बटण दाबले की दिवा लागला, असे सहज नसते; ती एक प्रदीर्घ व अविरत प्रयत्नांची, कष्टांची मालिका असते. नेहमी आशावादी विचार आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच ध्येय गाठावे लागते.
आजचा संकल्प
आपण निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जिद्द व चिकाटी यांसोबतच उच्च महत्त्वाकांक्षा ठेवू, झालेल्या त्रुटी वेळेवर भरून काढू व यशाला गवसणी घालू.
सौ. स्नेहलता स. जगताप.
====================

0 टिप्पण्या