पोलीस प्रशासन आपल्या दारी उपक्रम राबविणार - प्रशांत डगळे
वृत्त एकसत्ता न्यूज
पंढरपूर/ प्रतिनिधी
ग्रामीण भागातील मुली, महिला यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पोलीस प्रशासन आपल्या दारी हा उपक्रम राबविन्यात येणार आहे. अशी माहिती पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कुल व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स आणि निर्भया पथक यांच्या संयुक्त विध्यमाने महिला सक्षमीकरण या विषयी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी स्कुल कमिटीचे चेअरमन संभाजी शिंदे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या जिल्हा उपाध्यक्ष राजश्री ताड, उपसरपंच नितीन शिंदे, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष प्राची माळवदे,प्राचार्य के डी शिंदे, सुप्रिया यादव महिला पोलीस उपनिरीक्षक निर्भया पथक प्रमुख पंढरपूर विभाग , विधीतज्ञ विनोद गायकवाड. संशोधक व अभ्यासक तन्मय डगळे. निर्भया पथकाचे अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत शिंदे. लक्ष्मण कुचेकर. महिला पोलीस कॉन्स्टेबल निर्मला वाघमारे. शाहीन काझी आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डगळे म्हणाले की मुलींनी महिलांनी सोशल मीडियाचा वापर चांगला कामासाठी करावा. त्याचा वापर वाईट गोष्टी करिता करू नये. आपणास कुणी त्रास दिला तर आमच्या क्यू आर कोड वर किंवा व्हाट्सअप वर तक्रार करावी. म्हणजे आम्हाला कारवाई करता येईल. आपल्या ला कोणत्या ही प्रकारचा त्रास होत असेल तर तो त्रास होणार नाही. यांची दक्षता घेण्यासाठी पोलीस प्रशासन आपल्या दारी येत आहे. यांचा उपयोग आपण करून घ्या. असे प्रशांत डगळे म्हणाले.
यावेळी राजश्री ताड यांनी गावातील असणाऱ्या विविध समस्या सांगितल्या. त्याच बरोबर पोलीसानीही सहकार्य करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे यांनी केले. तर आभार संभाजी शिंदे यांनी मानले. यावेळी परिसरातील महिला, मुली, विध्यार्थीनी, शिक्षक, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या