मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 13/8/2026 :
सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाचे पाणी मिसळल्यामुळे नळाला येणारे पाणीसुद्धा गढूळ येते; मग त्यात तुरटी फिरवावी लागते. पाणी संथ झाल्यावर गाळ खाली बसतो व स्वच्छ, निवळ पाणी वर राहते.
अगदी तसेच आपल्या विचारांचेही असते. आपण खूप चिडलेले किंवा वैतागलेले असलो की डोक्यात विचारांचा मोठा गोंधळ चालू असतो. काय बोलतोय, काय करतोय काहीच समजत नाही व मनावर ताबा राहात नाही.
त्यासाठी जेव्हा मनःस्थिती बिघडलेली असते, तेव्हा मन स्थिर करणे अत्यंत आवश्यक असते. नकारात्मक विचारांना हद्दपार करणे व अगदी शांत राहणे जमले, तर थोड्याच वेळात सर्व वैचारिक गुंता सुटतो आणि योग्य मार्ग निघतो.
आजचा संकल्प
डोक्यात काही समस्यांचा गोंधळ झालेला असेल, तेव्हा कोणावरही न चिडता किंवा न रागावता थोडा वेळ घेऊ, शांतपणे विचार करू व समस्येतून मार्ग काढू.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या