हिमोग्लोबिन झटपट वाढविणारे ३ घरगुती पदार्थ- फक्त १ महिना खा, एनर्जी वाढून कामं उरकतील भरभर

 🩺हेल्थ मंत्रा | आरोग्य मंत्र |🩺

हिमोग्लोबिन झटपट वाढविणारे ३ घरगुती पदार्थ- फक्त १ महिना खा, एनर्जी वाढून कामं उरकतील भरभर

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 22/8/2026 :

बहुतांश महिलांमध्ये दिसून येणारी तक्रार म्हणजे त्यांचं हिमोग्लोबिन खूप कमी असतं.

हिमोग्लोबिन कमी असलं की त्यामुळे अशक्तपणा येणं, सतत थकवा जाणवणं, आळस येणं, गळून गेल्यासारखं वाटणं असे बरेच त्रास होतात...

हे सगळे त्रास कमी करायचे असतील तर शरीरातल्या लोहाचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. लोह कमी झालं की कित्येक जण त्यासाठी टॅबलेट्स किंवा सप्लिमेंट्स घेतात.

पण काही घरगुती पदार्थ खाऊनही शरीरातली लोहाची पातळी वाढवता येते. त्यासाठी नेमकं कोणते पदार्थ खायला हवे, याची माहिती आहारतज्ज्ञांनी dt.anushijain या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

त्यामध्ये त्यांनी सांगितलेला पहिला पदार्थ म्हणजे गूळ आणि फुटाणे. हे दोन्ही पदार्थ एकत्रित खाणं खूप फायदेशीर ठरतं. त्यातून लोह तर मिळतेच पण त्यासोबतच प्रोटीन्स, फायबर आणि इतर खनिजेही चांगल्या प्रमाणात मिळतात.

काळे तीळ हा देखील लोह वाढविण्याचा एक चांगला पर्याय मानला जातो. काळे तीळ थोडे भाजून घ्या आणि ते दिवसातून १ चमचा तरी खा. नुसते खायला आवडत नसतील तर सलाड, रायता, कोशिंबीर अशा पदार्थांमध्ये घालून खा.

तिसरा पदार्थ म्हणजे आवळा. यासाठी आवळा खाण्याची एक खास पद्धत आहे. त्यानुसार आवळा चिरून घ्या. त्यावर मिरेपूड आणि मध घालून खा. यामुळे पचन जास्त चांगलं होतं तसेच शरीरात लोह शोषून घेण्याची क्षमता वाढत जाते.

♻️                                 ♻️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या