विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक1/8/2026 :
आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!
बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या अत्यंत जहाल शब्दांनी ब्रिटिशांना 'सळो की पळो' करून सोडले. कणखर भाषणे करून व वृत्तपत्रांत जहाल अग्रलेख लिहून त्यांनी अथांग जनजागृती केली; स्वतःच्या प्रकृतीचा किंवा कुटुंबाचा विचार न करता स्वतःला पूर्णपणे स्वातंत्र्यसंग्रामात झोकून दिले.
तुकाराम भाऊराव अर्थात अण्णा भाऊ साठे हे महान कवी, नाटककार, लेखक व शाहीर होते. त्यांच्या अनेक कादंबऱ्या व नाटके प्रकाशित झाली आहेत. सामाजिक वास्तव व दलितांच्या परिस्थितीवर आधारित कथांमधून त्यांनी अन्यायाविरुद्ध परखड लिखाण केले.
मुलांनो, लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची चरित्रे वाचू या आणि त्यांच्या महान विचारांतून जीवनाचा आदर्श घेऊ या!
सौ. स्नेहलता स. जगताप.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

0 टिप्पण्या