विचारधारा

 


विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 5/8/2026 :

या वयात अजून आपले विचार पूर्णपणे परिपक्व झालेले नसतात. कोणी काही सांगितले किंवा कुठेतरी काही ऐकले की त्यावर आपला लगेच विश्वास बसतो आणि आपल्याला तेच सत्य वाटते.

खरे तर प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणे आणि कोणाकडून तरी त्या घटनेबद्दल ऐकणे यामध्ये फार मोठा फरक असतो. व्यक्तीनुसार शब्द बदलतात, उच्चारांतील चढ-उतार बदलतात आणि त्यानुसार अर्थही बदलतात.

मुलांनो, वाक्यातील स्वल्पविराम जरी इकडचा तिकडे झाला, तरी अर्थ पुरता बदलून जातो. सांगणाऱ्याच्या भावना व शब्दांचा संदर्भ बदलला तरी मोठा गैरसमज होण्याची शक्यता असते. त्यामुळे केवळ ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून कोणताही निर्णय घेणे चुकीचे ठरू शकते.

नेहमी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या, अनुभवलेल्या व नीट पारखून घेतलेल्या गोष्टींवरच विश्वास ठेवा!

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या