🪳कॉकरोच जनता पार्टीला पाकिस्तानी भट्टीचे बळ…

 🪳कॉकरोच जनता पार्टीला पाकिस्तानी भट्टीचे बळ…

माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 20/8/2026 :

 कोल्हापूर -जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन झाले, तेव्हा पाकिस्तानमधून सोशल मीडियाची ४०० हँडल्स सक्रिय होती. ‘नीट’ (NEET) पेपरफुटीप्रकरणी या हँडल्सवरून सतत काही पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल करण्यात येत होते. आंदोलनात पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ (ISI) समर्थित दहशतवादी घुसखोरी करून घातपात करण्याच्या तयारीत होते, अशी माहिती उघड केल्यामुळे पंजाबमधील ‘आम आदमी पार्टी’च्या सरकारने गुरुप्रीत सिंह भुल्लर यांना अमृतसरच्या पोलिस आयुक्त पदावरून काढून टाकले. आता तर ‘आयएसआय’चा हस्तक आणि पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याने एका व्हिडिओद्वारे कॉकरोच जनता पार्टीला समर्थन जाहीर केले आहे.

भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते की, शहजाद भट्टीच्या संपर्कात असलेल्या देशातील २०० जिहादी तरुणांना स्वातंत्र्यदिनाआधी अटक करण्यात आली. शाह यांच्या वक्तव्यानंतर शहजाद भट्टीने एक व्हिडिओ जारी केला. “भारतात ज्या २०० तरुणांना अटक करण्यात आली, त्यांचा माझ्याशी काडीचाही संबंध नाही,” असे भट्टीने स्पष्ट केले.

भट्टी गेली अनेक वर्षे भारतात जिहादी तरुणांचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने सोशल मीडियाला हत्यार बनवले आहे. व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून जिहादी साहित्य व्हायरल करायचे; ज्यामध्ये मीम्स, व्हिडिओ आणि मजकुराचा समावेश असतो. यातील काही तरुण देशात हेरगिरी व घातपातासाठी वापरले जातात. त्यासाठी सढळ हस्ते पैसा खर्च केला जातो. आखाती देशांमध्ये बसून भट्टीचे हे चाळे सुरू असतात. भारतात त्याच्या कामावर पाणी फेरण्याचे काम सुरक्षा यंत्रणा करत आहेत.

जारी केलेल्या व्हिडिओमध्ये भट्टी म्हणतो की, “सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतलेले हे सगळे तरुण कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतर येथील आंदोलनात सहभागी झाले होते. फेस रेकग्निशन तंत्रज्ञानामुळे त्यांची चेहरेपट्टी पोलिसांकडे होती; त्याचाच वापर करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई माझ्या नेटवर्कवर झालेली नसून कॉकरोच जनता पार्टीच्या नेटवर्कवर झालेली आहे. ज्या तरुणांना अटक झाली, त्यांना मी सर्व प्रकारचे सहकार्य करणार आहे. एवढेच नाही, तर मी कॉकरोच जनता पार्टीलाही पाठिंबा जाहीर करतो आहे. यापुढे त्यांना काहीही लागले, तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा.”

काही दिवसांपूर्वी खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंत सिंह पन्नू याचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्याने कॉकरोच जनता पार्टीला पूर्ण पाठिंबा जाहीर केला होता आणि त्यांच्या आंदोलनाला १ दशलक्ष डॉलरची मदत जाहीर केली होती. तो व्हिडिओ आणि शहजाद भट्टीचा व्हिडिओ या दोन्हीमध्ये कमालीचे साम्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि त्यांच्या सरकारला दोघांनीही शिव्या घातल्या आहेत; तर ‘कॉकरोच’ मंडळींचे भरपूर कौतुक केले आहे. दोन्ही व्हिडिओंमध्ये त्यांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.

भट्टी अमित शाह यांच्यावरही घसरला आहे. तो म्हणतो, “अमित शाह मला गँगस्टर म्हणतात; परंतु त्यांनीच त्यांच्या देशात गँगस्टर पाळले आहेत. कॅनडात निज्जरची हत्या याच गँगस्टरनी केली.” भारताच्या गृहमंत्र्यांना दमबाजी करण्याइतपत भट्टीची हिम्मत झाली आहे. पाकिस्तानात बसलेल्या या दहशतवाद्यांनी अज्ञातांचा धसका घेतला आहे. भट्टीने या व्हिडिओत जाहीर केले आहे की, तो पाकिस्तानात नाही. मात्र, तो नेमका कुठे आहे, हे ही त्याने स्पष्ट केलेले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या