मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 11/8/2026 :
नाती जशी रक्ताची असतात, तशी ती जोडलेलीही असतात. आपली परस्परांतील नाती ही विश्वासावर अवलंबून असतात; विशेषतः कुटुंबातील नाती जपण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात.
जिथे निकोप नाती असतात, तिथे प्रत्येकाचे शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य उत्तम राहते. दैनंदिन जीवनात आपुलकीचे चार शब्द, मायेचा स्पर्श व भावनिक आधार अत्यंत महत्त्वाचा असतो.
सततची वादावादी, मनात आकस ठेवणे, टोचून वा घालून-पाडून बोलणे आणि शिवीगाळ करणे यामुळे नात्यांत दरी पडते व मने दुरावतात. त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात आणि कौटुंबिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडते.
आजचा संकल्प
आपली परस्परांतील नाती सुदृढ असणे ही आपली सर्वांत मोठी कौटुंबिक गुंतवणूक आहे हे लक्षात घेऊ व आपण सर्वजण नाती बळकट करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या