✈️जगातील सर्वात मोठे विमानतळ

 ✈️जगातील सर्वात मोठे विमानतळ 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 15/8/2026 :

अनेक देशांपेक्षाही मोठा आकार, धावपट्टीपेक्षा जास्त दिसते रिकामी जमीन,

दुसऱ्या देशात किंवा राज्यात कमी वेळेत प्रवास करण्यासाठी हवाई मार्ग हा उत्तम पर्याय मानला जातो. यासाठी भारतासह जगभरात अनेक विमानतळ उभारण्यात आले आहेत. प्रत्येक विमानतळाचे काही ना काही वेगळे वैशिष्ट्य असते. पण, तुम्हाला जगातील अशा सर्वात मोठ्या विमानतळाबद्दल माहिती आहे का, जो आपल्या आकारामुळे एखाद्या लहान शहरासारखा दिसतो ? हा विमानतळ इतका विशाल आहे की, त्याच्यासमोर दिल्ली, लखनऊ आणि कोलकाता यांसारखी शहरेही लहान वाटू लागतात. या अवाढव्य आकारामुळे या विमानतळाला 'विमान क्षेत्रातील महाकाय' (Aviation Giant) असेही म्हटले जाते,

जगातील सर्वात मोठे विमानतळ सौदी अरेबियाच्या दम्मम शहराजवळ असुन त्याचे नाव आहे 'किंग फहद इंटरनॅशनल एअरपोर्ट' असे आहे. १९९९ मध्ये त्याचे उद्घाटन झाले होते. या विमान तळावरून रोज सुमारे १ कोटी प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या हिशेबाने हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे विमानतळ आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासाचे हे एक मुख्य केंद्र बनलेले आहे. या विमानतळाचा आकार इतका मोठा आहे की ते मुंबई महानगरीपेक्षाही मोठे आहे. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ६०३ चौरस किलोमीटर आहे तर या विमानतळाचे क्षेत्रफळ ७८० चौरस किलोमीटर आहे. हे विमानतळ केवळ आकारानेच मोठे आहे असे नाही. तिथे अनेक अद्ययावत सुखसुविधाही आहेत. या विमान तळावरून जगभरातील मोठ्या शहरांकडे विमानांचे उड्डाण होत असते. सौदी अरेबियाच्या महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी केंद्रांपैकी हे एक आहे. सौदी अरेबियाचे राजे फहद बिन अब्दुलअजीज अल सौद यांच्यावरून या विमानतळाचे नाव ठेवले आहे. याठिकाणी चार रनवे, दोन टर्मिनल आणि अनेक पार्किंग क्षेत्र आहेत. ते विमानतळ दरवर्षी १ लाख २५ हजार टन कार्गो हँडल करते.

याठिकाणी अनेक शॉपिंग मॉल्स, फूड कोर्ट, हॉटेल्स आणि अनेक सुखसुविधा आहेत. या विमानतळाला जगातील एक 'सिटी एअरपोर्ट' असेही म्हटले जाते.  अवाढव्य आकारामुळेच या विमानतळाची नोंद 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्'मध्ये झाली आहे.

✍️ संकलन : प्रविण सरवदे, कराड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या