प्रताप क्रीडा मंडळाच्या आट्यापाट्या स्पर्धेत शिरढोणचा श्रीकृष्ण संघ विजेता

 

प्रताप क्रीडा मंडळाच्या आट्यापाट्या स्पर्धेत शिरढोणचा श्रीकृष्ण संघ विजेता

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 23/8/2026 : 

 प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज यांचे वतीने मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या भव्य आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेत अंतीम अटीतटीच्या सामन्यात श्रीकृष्ण, शिरढोण (ता. पंढरपूर) या संघाने  बिटू माने, धायटी (ता. सांगोला) या संघाचा पराभव करत विजेतेपदासह  विजेता चषक व रोख रु ४४ हजारांचे बक्षीस पटकाविले. तर उपविजेता धायटी संघाने रोख रु. ३३ हजारांचे बक्षीस मिळविले. स्पर्धेचे बक्षीस वितरण सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सह.साखर कारखान्याचे चेअरमन व मंडळाचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले.

   विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे  झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक, व स्पर्धा समितीचे प्रमुख सयाजीराजे      मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी दीपकराव खराडे-पाटील, सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन  महादेव अंधारे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव  हर्षवर्धन खराडे-पाटील, अप्पासाहेब मगर आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. मैदान पूजनानंतर स्पर्धेला सुरुवात झाली.

ग्रामीण भागातील या पारंपरिक खेळाला  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  पंढरपूर २८ संघ, माळशिरस २५, सांगोला ७, माढा ६, मंगळवेढा १ आणि इंदापूर १, अशा  ६८ नामवंत संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

स्पर्धेतील तृतीय क्रमांक डोनाई संघ डोनमळा, पळशी (ता.पंढरपूर) यांनी रोख रु. २२ हजार, चतुर्थ क्रमांक  सद्गुरू भवानीगिरी, शिरभावी (ता.सांगोला) यांनी रोख रु. ११ हजार तर उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेल्या बालाजी मित्र मंडळ, गादेगाव (पंढरपूर), श्रीराम पेहे (पंढरपूर), जय हनुमान तांदुळवाडी (माळशिरस) आणि काशिलिंग धायटी (सांगोला) या चार संघांना प्रत्येकी रोख रु. ५ हजाराचे बक्षीस देण्यात आले.

     मुख्य पंच म्हणून बंडूकाका ताटे-देशमुख, पंडित नाना ताटे-देशमुख, आबासाहेब ताटे-देशमुख, विक्रम मिसाळ, उद्धव केंगार, बाळासाहेब सरवदे आणि लालासाहेब बाबर यांनी काम पाहिले. तसेच ६८ फाटी पंचांनी स्पर्धेतील सामन्यांचे पंच म्हणून जबाबदारी पार पाडली.

या स्पर्धेस मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले-पाटील, सचिव बिभीषण जाधव, स्पर्धा प्रमुख भीमाशंकर पाटील, सुभाष चव्हाण, यशवंत माने देशमुख, सर्व संचालक, आजी-माजी खेळाडू, सदस्य, क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सचिव बिभीषण जाधव यांनी प्रस्ताविकात मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला . स्पर्धेचे समालोचन बापूसाहेब लोकरे यांनी केले. सूत्रसंचालन  इलाई बागवान, अनंत कोळी, किरण सूर्यवंशी आणि राजकुमार पाटील यांनी केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या