विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 6/8/2026 :
६ ऑगस्ट हा दिवस *'जागतिक हिरोशिमा दिन'* म्हणून पाळला जातो. १९४५ मध्ये याच दिवशी अमेरिकेने 'लिटल बॉय' नावाचा अणूबॉम्ब जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकला आणि तेथे भीषण विध्वंस झाला.
या हल्ल्यात हजारो लोक तात्काळ मृत्युमुखी पडले, तर त्याहून अधिक लोक मरणासन्न स्थितीत गेले. पुढील अनेक पिढ्यांना त्याचे भयंकर दुष्परिणाम भोगावे लागले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जगाला शांततेचे व सुरक्षिततेचे खरे महत्त्व पटवून दिले.
मुलांनो, अण्वस्त्रे ही मानवासाठी नेहमीच घातक असतात. जगात कायमस्वरूपी शांतता लाभायची असेल, तर कोणत्याही देशाने अण्वस्त्रे बाळगू नयेत व त्यांचा वापर करू नये; तरीही आज अण्वस्त्रांची भीती दाखवून काही देशांमध्ये युद्ध चालू असलेले आपण पाहत आहोत.
म्हणूनच _"दुष्टांची बुद्धी बदलून त्यांना सत्कर्म करण्याची आणि जगात शांतता प्रस्थापित करण्याची प्रेरणा मिळो!"
अशी आपण आज प्रार्थना करूया.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या