मनाची शुद्धता


मनाची शुद्धता
 
वृत्त एकसत्ता न्यूज 
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 
अकलूज दिनांक 12/8/2026 :
सध्या पालक म्हणून आपण सर्व जण खूप जागरूक आहोत. मुलांचे शालेय जीवन कसे असावे, कोणत्या शाळा, कोणते माध्यम निवडावे... असे सर्व आपण चर्चा करून व माहिती काढून ठरवतो.
मुलांनी मेरिटमध्ये यावे, त्यांनी नेहमी टॉपर राहावे असा पालकांचा अट्टाहास असतो. त्यासाठी पाल्याची स्वतःची आवड किंवा इच्छा या गोष्टींचा आपण विचारही करत नाही. त्यांच्या मनाचा विचार न करता आपल्या इच्छा आपण मुलांवर लादतो.
खरे तर शैक्षणिक प्रगतीइतकेच, किंबहुना त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे असतात संस्कार! मुलांमध्ये योग्य नैतिक मूल्ये रुजणे अत्यंत महत्त्वाचे असते; कारण समाजात वावरताना शेवटी हेच संस्कार कामी येतात.
आजचा संकल्प
आपल्या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून जसे नेहमी प्रयत्नशील राहू, तसेच त्यांना सुविचारी व सुसंस्कृत बनवण्यासाठीही खास प्रयत्न करू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या