विचारधारा

 


विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 11/8/2026 :

दैनंदिन जीवनात अनेक समस्या येतात; काही सहज सुटतात, तर काही जटिल असतात. सततच्या समस्यांनी आपण कधी कधी वैतागून जातो आणि "माझ्याच मागे का?" असा प्रश्न मनात पडतो.

समस्यांमध्ये नेहमी संधी शोधायला शिका. ग्लास अर्धा रिकामा समजायचा की अर्धा भरलेला, हे शेवटी आपणच ठरवायचे असते. आपला दृष्टिकोन सकारात्मक असेल तर समस्या सोडवणे नेहमी सोपे जाते.

मुलांनो, एखादी गोष्ट अवघड असू शकते, पण ती कधीच अशक्य नसते. त्यासाठी प्रयत्न जास्त करावे लागतील, पद्धत बदलावी लागेल; पण ती गोष्ट आपण नक्कीच शक्य करून दाखवू शकतो. आशावादी असणे यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

जगात अशक्य काहीच नसते; कारण 'अशक्य' या शब्दातच 'शक्य' लपलेले असते.

 सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या