धर्मात राजकारण मिसळणे सर्वात वाईट.
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 19/8/2026 :
राजकारण धर्मात मिसळणे ही अंतिम अपवित्रता आहे.“The ultimate sacrilege: mixing politics with religion.”― Marty Rubin.
वरील विधानाचा सर्वात अधिक वाईट अनुभव सध्या आपण भारतीय घेत आहोत.सध्याचे राजकारण हिंदू वादाचे आहे असे सांगून,बहुतेक सर्व उद्योग,जमिनी,उदयॊग्यसंस्था बँक,शिक्षण संस्था छोटे मोठे उद्योग आणि बहुतांशी संपत्ती हिंदूंच्या मालकीची असून सुद्धा हिंदू धर्म म्हणजेच हिंदू माणूस धोक्यात आला आहे असे भासवून राजकीय सत्ता काबीज केली आणि तीच आपल्या मुठीत रहावी म्हणून अट्टाहासाने धर्माच्या नावाने द्वेष पसरविणे प्रयत्न चालू आहेत.त्यांना हिंदू धर्मात कोणतीही सुधारणा घडवून आणावयाची नाही, लोकांना खरा मानवता धर्म सांगावयाचा नाही परंतु त्यांनी धर्माची अफू घेऊन भ्रमात राहण्यासाठी तथाकथित भक्तांना साहाय्य होतील अशा गोष्टी चालू आहेत.मग सर्व तीर्थस्थानाची सुधारणा,मंदिरांना मदत,भक्तासाठी रस्ते आणि सुविधा.महागाई गरिबी बेरोजगारी वाढत चालली त्या साठी शासनाला दोषी धरू नये म्हणून जसे मंदिराच्या बाहेर भीक वाटली जाते तसे शिधा वाटप,अन्नछत्रे चालू आहेत. आता महाराष्ट्रात"लाडकी बहीण" योजना जोरात आहे . सर्वच बहिणी लाडक्या असतील तर त्यांचे भाऊ कोणत्या का जाती धर्माचे असो,"लाडके भाऊ"का होऊ शकत नाहीत? सामान्य जनतेला सत्ताधीश आपलेच आहेत असे वाटावे म्हणून सण उत्सव साजरे करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. कितीही ध्वनी प्रदूषण होऊ द्या डॉल्बी लावा,जलप्रदूषण करा आणि शाळा कॉलेजना सुट्टी असे प्रयोग चालू आहेत.सत्ता घेताना संविधानातील तरतुदी प्रमाणे घेतली,परंतु सत्ता वापरताना मात्र त्यातील मुख्य मूल्ये पायदळी तुडविली जात आहेत. त्यात धर्मनिरपेक्षता,समाजवाद,तसेच स्वातंत्र्य,समता आणि बंधुभाव यांचा समावेश आहे.लोकांनी आपल्या सुविधांसाठी कररूपाने दिलेला पैसा कसाही खर्च केला जाऊ लागला आहे.धार्मिक भावना भडकाविणाऱ्या आणि हेट म्हणजे द्वेषमूलक भाषण करणाऱ्यास अभय मिळत आहे. हे सर्व धर्मच्या नावाने चाललेला अधर्म आहे असे वाटत नाही?
हिंदू वादी मूळ हिंदू धर्म आणि त्यातील अन्याय यावर काहीच बोलत नाहीत.त्यांचा हिंदू धर्म म्हणजे मुस्लिम ख्रिश्चन द्वेष.तसेच मनुस्मृतीमधील दलित द्वेष आणि अंधःश्रद्धेवर आधारित आहे.त्याची चिकित्सा करून सांगणाऱ्या पुरोगामी विचारवंताची हत्या होत असून मारेकरी सापडत नाहीत.भारताचेच नागरिक असलेल्या मुस्लिमाना राष्ट्रद्रोही ठरवून त्यांच्या विरुद्ध दंगे घडवून आणणाऱ्यांना अजूनपर्यंत शिक्षा झाली नाही. धर्मद्वेषाचा हा उद्दामपणा वाढत चालला आहे सत्ताधीशांचा एक खासदार भर सभेमध्ये मुस्लिम खासदाराला वाट्टेल ते बोलतो,परंतु त्यांच्यावर कोणतीच गंभीर ऍक्शन झालेली दिसत नाही.दलित आदिवासी स्त्रीची नग्न धिंड काढली जाते,कर्ज फेडले असतात दलित स्त्रीला नग्न करून तिच्यावर लघवी केली जाते.बेपत्ता स्त्रियांचे प्रमाण वाढत चालले आहे आणि तिकडे ३८ वर्षांनी मिळणाऱ्या आरक्षणाबद्दल स्त्रिया कडून विजयोत्सव साजरा होत आहे.यांच्या सर्व संवेदना बधिर झाल्या आहेत का?या पेक्षा अपवित्रपणा काय असणार आहे. आरक्षणाच्या नावावर मराठा,ओबीसी धनगर याना परस्परविरुद्ध लढविले जात आहे.आणि तिकडे आरक्षण ना पाहता परीक्षा ना घेता सरकारी अधिकारी नेमले जात आहेत,सरकारी उदयॊग विकून आरक्षणाचं रद्द केले जात आहे.शिक्षका पासून ते इतर नोकर भरती कंत्राटी पद्धतीने केली जात आहे,म्हणजे तुम्ही आरक्षणासाठी भांडा आम्ही नोकऱ्याच रद्द करतो असे हे मायाजाल आहे.सरकारी शाळा बंद होत आहेत.मोठ्या भांड्वलदाराना त्या विकल्या जाणार. प्रचंड रकमेची बँक कर्जे माफ केली जात आहेत आणि काही कर्जे ना फेडता पळून गेली त्यांच्यावर काय ऍक्शन घेतली? सर्व सत्य समोर आहे तरी मंदिरातील गर्दी वाढतच आहे.अशा स्थितीत," राजकारण धर्मात मिसळणे ही अंतिम अपवित्रता आहे.“The ultimate sacrilege: mixing politics with religion.”― Marty Rubin. हेच सिद्ध होत नाही का?आपल्या संविधानाने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिले असताना मुस्लिम,ख्रिश्चन धर्मीयांना छळाने कितपत योग्य?काहीं श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालले आहे आणि गरीब अधिक गरीब.समाजवादी धोरण संविधानच नमूद आहे पण खाजगीकरणाचा वेग वाढला आहे.धर्म द्वेष जातीद्वेष यात समाज होरपळून जात आहे मग बंधुभाव शब्दच अर्थहीन झाला आहे. स्त्रियांचे हाल पाहिल्यास समता काहीं उपयोगाची नाही असेच दिसते. विधासभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत , त्यामुळे परत धर्मद्वेषाला खतपाणी घातले जात आहे . बंगला देश मधील हिंदू धोक्यात आहेत अशा खोट्या पोस्ट फैलावून भारतात मुस्लिम द्वेष पसरविला जात आहे. भारत होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचाराचे त्यांना काहींचं वाटत नाही असे हे ढोंगी लोक आहेत. या सर्व गोष्टीसाठी बहुजन समाजाच्या तरुणांना भडकविले जात असून याचे दुष्परिणाम त्यांनाच सोसावे लागणार आहेत. अशा वेळी त्यांना सद्भावना यात्रा आणि लोकप्रबोधन याच मार्गाने बाहेर काढले पाहिजे . सत्य अहिंसा आणि सत्याचा आग्रह परत एकदा हाती घ्यावे लागेल. मगआम्हीच आमच्या देशाचे रक्षण करणार नाही तर कोण करेल? जागे व्हा आणि राजकारणातून धर्माला हद्दपार करून त्याची अपवित्रता नष्ट करू या
प्रा डी यु पवार.
18ऑगस्ट 2026✍️
0 टिप्पण्या