मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 5/8/2026 :
शेतकरी शेताची मशागत करतात. नांगरणी करून त्यातील गवताच्या मुळ्या वेचून बाजूला काढतात. एक चांगला पाऊस झाला की वापशावर पेरणी करतात आणि वरचेवर पिकातील तण व गवत काढून टाकतात.
असे केले नाही तर शेतात पीक कमी व गवतच जास्त दिसते. वाढलेले गवत मूळ पिकाला मारून टाकते; अशा वेळी गवताचे निर्मूलन करणे फार कठीण होऊन बसते.
अगदी असेच आपल्या विचारांचेही असते. वेळीच नकारात्मक विचारांचे निर्मूलन केले नाही, तर आपल्या मनात सकारात्मक विचारांना जागाच राहात नाही. म्हणूनच नकारात्मक विचारांना मनात थारा न देणे हेच योग्य ठरते.
आजचा संकल्प
आपल्या मनावर सतत सुसंस्कार करणे, नेहमी सद्विचार बाळगणे आणि जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवणे याला प्राधान्य देऊ आणि सन्मार्गाने जीवन जगू.
सौ. स्नेहलता स. जगताप.
====================

0 टिप्पण्या