मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन :आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 3/8/2026
जीवन जगण्यासाठी पैसा तर लागतोच, पण फक्त पैसे असून भागत नाही; त्यांचा उपभोग घेण्यासाठी आरोग्यही तितकेच चांगले असावे लागते. या दोन्हीच्या जोडीला आपले चारित्र्यही स्वच्छ असावे लागते, अन्यथा केवळ संपत्ती व आरोग्याला काहीही अर्थ उरत नाही.
आपल्याजवळ पुरेशी संपत्ती असेल व आरोग्य निरोगी असेल, तर आपण आयुष्यात धाडसी निर्णय घेऊ शकतो आणि साहसी कार्य करू शकतो. दूरवरचा प्रवास करणे, प्रदीर्घ वेळ काम करणे किंवा सामाजिक कार्य करणे या गोष्टी सहज शक्य होतात.
त्यातही आपले चारित्र्य निष्कलंक असेल, तर या सर्व गोष्टी अत्यंत प्रभावीपणे पार पाडता येतात. आपल्या कार्याचे कौतुक होते, समाजात मान-सन्मान मिळतो, लोक आपले अनुकरण करतात आणि आपला सल्ला घेतात. या सर्व सकारात्मक घटकांमुळे आपले मानसिक आरोग्यही उत्तम राहते.
आजचा संकल्प
आयुष्यात पद व पैसा मिळवत असताना आपण आपले आरोग्य जपू. चारित्र्यसंपन्न जीवन जगण्यासाठी या दोन्हीपेक्षा संस्कारांना सर्वोच्च महत्त्व देऊ आणि यशस्वी होऊ.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या