माळेवाडी अकलूज येथील श्री सोमेश्वर मंदिरात मानाची पूजा आणि महाआरती संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 13/8/2026 :
श्रावणमास शुभारंभाचे पहिल्या दिवशी गुरुवार दि. 13/8/2026 रोजी सायंकाळी 7: 15 वाजता माळेवाडी - अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथील मोरेवस्ती - संजयनगर मधील श्री सोमेश्वर मंदिरात मानाची पूजा आणि महाआरती शिवभक्त, प्रचारक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्या हस्ते संपन्न झाली. पूजा व महाआरती नंतर प्रसाद वाटप होऊन श्री सोमनाथ विनवण्यांचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी देवस्थानचे प्रमुख अप्पा निवृत्ती मोरे महाराज, प्रचारक सुनील ज्ञानेश्वर कांबळे, सतीश अप्पा मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर रात्री आंबेडकर नगर अकलूज मधील शिवशक्ती भक्त सदाशिव ज्ञानोबा धाईंजे यांच्या श्री सोमेश्वर दरबारात पूजा व दर्शन घडून आले.

0 टिप्पण्या