१५ ऑगस्ट... भारतीय स्वातंत्र्य दिन
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 15/8/2026 :
१५ ऑगस्ट... भारतीय स्वातंत्र्य दिन... भारताचा विशेष महत्वाचा दिवस. ब्रिटिश साम्राज्या पासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरात बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. जुलमी ब्रिटिश राजवटीमधून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करून आपले आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य वीरांना सलाम करण्याचा हा दिवस आहे. स्वातंत्र्यासाठी प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे होते पण ध्येय मात्र एकच होते आणि ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य. देशाची ही अखंडता व सार्वभौमत्व टिकविण्यासाठी आपली एकता कायम अशीच ठेवूया. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले. भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो... !!

0 टिप्पण्या