‼️ डुमस समुद्रकिनारा, गुजरात ‼️
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 20/8/2026 :
गुजरातच्या सुरत शहरातील डुमस समुद्रकिनारा आणि नूतनीकरण केलेले डुमस सी फेस प्रकल्प हा अरबी समुद्राच्या खंभातच्या आखातावर वसलेला एक प्रमुख नि आधुनिक पर्यटन केंद्र आहे. हा किनारा त्याच्या काळ्या वाळूसाठी, सुंदर सूर्यास्तासाठी आणि अलीकडील हाय-टेक सुविधेमुळे प्रसिद्ध आहे.
डुमस समुद्रकिनारा हा सुरत शहराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला सुमारे २१ किमी अंतरावर स्थित आहे. येथील वाळूचा रंग काळा आहे, ज्यात लोहाचे प्रमाण जास्त असते. खंभातच्या आखातातील तीव्र भरती ओहोटीमुळे येथील समुद्र काही वेळा किनाऱ्या पासून तब्बल १००० फूट मागे जातो. सुरत महानगर पालिकेने या किनाऱ्याचा कायापालट करून याला आधुनिक रूप दिले. येथील अर्बन बीच आणि प्लाझा हे कुटुंबांना फिरण्यासाठी आणि विश्रांतीसाठी सुंदर जागा आहे. येथे मुलांसाठी आधुनिक खेळणी क्षेत्र, हिरवळ आणि चालण्यासाठी सुंदर रस्ते आहेत. तसेच वाहनांच्या सुरक्षित पार्किंगसाठी मल्टीलेव्हल कार पार्किंग आणि आकर्षक रोषणाई केली आहे.
संकलन : मिलिंद पंडित कल्याण
संदर्भ : इंटरनेट

0 टिप्पण्या