मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 4/8/2026 :
आपल्या प्रत्येकाला वाटत असते की कोणतेही काम करताना आपली कोणतीच चूक होऊ नये; सगळे कसे बिनचूक व्हावे. गोष्टी अगदी 'परफेक्ट' व्हाव्यात म्हणून आपण नेहमी प्रयत्नशील असतो.
खरे तर असा आग्रह असणे चुकीचे नाही, पण एखादी गोष्ट थोडीबहुत अपूर्ण राहिली किंवा बिघडली तरी काही हरकत नाही; कारण त्यात अजून काही नवीन सुधारणा करायला किंवा विचार करायला वाव असतो.
एकदा का गोष्ट परिपूर्ण झाली की त्यात नवीन काही करायला संधी उरत नाही आणि काम तिथेच थांबते. काम थोडे अपूर्ण असेल तर इतरांकडून काही वेगळ्या व चांगल्या सूचना येऊ शकतात आणि आपल्याला अजून काही नावीन्यपूर्ण करण्याची संधी मिळते.
आजचा संकल्प
एखादी गोष्ट बिघडली, चुकली किंवा अपूर्ण राहिली, तरी त्याचे जास्त वैषम्य न वाटू देता नवीन कल्पनांनुसार ती पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करू आणि त्यात योग्य सुधारणा करू.
सौ. स्नेहलता स. जगताप.
====================

0 टिप्पण्या