◼️बायका पुरुषांपेक्षा जास्त जगतात, ◼️संशोधनाचा दावा,

 ◼️बायका पुरुषांपेक्षा जास्त जगतात,

◼️संशोधनाचा दावा, 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन :आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 4/8/2026 : जन्म, मृत्यूवर कोणाचेही नियंत्रण नसते असे म्हटले जात असले तरी, महिलांचे आयुष्य (Women longevity secret) पुरुषांपेक्षा जास्त असते असे मानले जाते. जगभरातील बहुतांश देशांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक काळ जगतात. महिला पुरुषांपेक्षा तब्बल १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जगतात, असे एका संशोधनातून समोर आले आहे. जगभरातील संशोधनानुसार, महिलांचे सरासरी आयुष्य पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते.

What is the secret behind women's longer life

एका विशिष्ट वयानंतर महिलांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत अधिक दिसून येते. जगभरातील अनेक संशोधनांमध्येही महिलांचे सरासरी आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. पण यामागचे नेमके कारण काय? महिलांच्या दीर्घायुष्याचे सिक्रेट त्यांच्या लाईफस्टाईल दडलेले आहे की त्यांच्या शरीररचनेत? पण असं का होतं? पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या दीर्घायुष्यामागे नेमके काय सिक्रेट आहे? हा केवळ एक योगायोग आहे की यामागे काही ठोस वैज्ञानिक कारणे आहेत? ऑक्सफर्ड इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन एजिंगच्या डायरेक्टर प्रोफेसर सारा हार्पर आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते, महिलांच्या या लाँग लाईफ मागे त्यांची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांची जैविक रचना कारणीभूत असते. पुरुषांपेक्षा महिला जास्त जगण्यामागची नेमकी कारणं कोणती आहेत ते पाहूयात.

१. इस्ट्रोजेन हार्मोन :

महिलांच्या शरीरात नैसर्गिकरीत्या आढळणारा इस्ट्रोजेन हार्मोन (Estrogen Hormone) हा त्यांच्या दीर्घायुष्याचं सर्वात मोठं सिक्रेट आहे. हा हार्मोन महिलांच्या शरीरात एका अँटी ऑक्सिडंटसारखं काम करतो. यामुळे महिलांमधील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते, हृदयाचे आजार टळतात आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. याशिवाय मेंदू आणि हाडे मजबूत ठेवण्यातही हा हार्मोन महत्त्वाची भूमिका बजावतो, जो पुरुषांमध्ये नसतो.

२. खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी :

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, खाण्यापिण्याच्या बाबतीत महिला पुरुषांपेक्षा जास्त जागरूक असतात. महिला आपल्या आहारात सकस आणि पौष्टिक अन्नपदार्थांचा समावेश करण्यावर भर देतात. याउलट, पुरुष अनेकदा खाण्यापिण्याच्या बाबतीत निष्काळजी असतात. त्यांचा आहार कमी हेल्दी असल्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचा धोका जास्त असतो.

३. व्यसनांपासून दूर :

प्रोफेसर सारा हार्पर यांच्या मते, जगभरात पुरुष महिलांच्या तुलनेत धूम्रपान (Smoking) आणि मद्यपान (Alcohol) जास्त प्रमाणात करतात. पुरुषांच्या या वाईट सवयी गंभीर आजारांचा आणि मृत्यूचा धोका वाढवतात, तर महिला या व्यसनांपासून बऱ्याच अंशी दूर असतात.

४. रिस्क घेण्याची प्रवृत्ती आणि लाईफस्टाईल :

बायोलॉजिकल कारणांशिवाय, पुरुषांची जीवनशैली आणि त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यही याला कारणीभूत आहे. पुरुष सामान्यतः महिलांपेक्षा जास्त शारीरिक जोखीम (High Risk) असणारी कामे करतात, ज्यामुळे अपघात किंवा गंभीर दुखापतींचा धोका वाढतो. सामान्यतः पुरुषांमध्ये धूम्रपान, मद्यपान, बेफिकीर वाहन चालवणे किंवा जोखमीची कामे करण्याचे प्रमाण अधिक असते. या सवयींचा परिणाम आयुर्मानावर होऊ शकतो. महिला स्वतःच्या आरोग्याची आणि सुरक्षेची जास्त काळजी घेतात.

५. जैविक रचना :

निसर्गानेच महिलांची शारीरिक आणि जैविक रचना अशा पद्धतीने केली आहे की त्या रोगांशी आणि इन्फेक्शनशी जास्त चांगल्या प्रकारे लढू शकतात. त्यांची प्रतिकारशक्ती पुरुषांपेक्षा उपजतच जास्त मजबूत असते, ज्यामुळे वाढत्या वयातही त्या रोगांना सहज बळी पडत नाहीत.

६. सामाजिक नातेसंबंध :

महिला कुटुंबीय, मित्रमैत्रिणी आणि सामाजिक संबंध अधिक जपतात. मजबूत सामाजिक आधार मानसिक आरोग्य सुधारण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करतो.

७. तणाव हाताळण्याची वेगळी पद्धत :

महिला आपल्या भावना व्यक्त करण्यास अधिक तयार असतात. त्यामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होते, तर भावना दडपून ठेवण्याची सवय आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते.

प्रोफेसर सारा हार्पर 

ऑक्सफर्ड इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन,

एजिंगच्या डायरेक्टर,

Women's longevity and health secrets

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या