ग्रामदैवत श्री अकलाई देवी भंडारा यात्रा उत्साहात संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन :आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 2/8/2026
हजारो देवी भक्त भाविकांच्या उपस्थितीमध्ये अकलूज चे ग्रामदैवत श्री अकलाई देवी चा भंडारा यात्रा उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात संपन्न झाला. पंढरपूरची आषाढी वारी संपताच आषाढी पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी ग्रामदैवत श्री अकलाई देवीचा भंडारा यात्रा उत्सव साजरा करण्याची परंपरा अखंड सुरू आहे.
यावर्षी शुक्रवार दि.31 जुलै रोजी देवस्थान ट्रस्ट आणि गुरु परिवाराच्यावतीने वतीने पहाटेची पूजा संपन्न झाली. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मानकरी फुले यांच्या वाड्यातून श्री अकलाई देवीच्या पालखीची पारंपरिक वाद्यांच्या ताल सुरात आणि देवीच्या नाम घोषात भंडाऱ्याची उधळण करीत मिरवणूक मंदिरापर्यंत काढण्यात आली. यामध्ये मानकरी, ग्रामस्थ देवी भक्त भाविक, आराधी, गोंधळी, भोपी, पोतराज, किन्नर इत्यादी सहभागी झाले होते. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मदनसिंह मोहिते पाटील, देवस्थान विश्वस्त जयसिंह मोहिते पाटील, सौ सुलक्षणादेवी मोहिते पाटील, किशोरसिंह माने पाटील इत्यादींसह मोहिते पाटील, माने पाटील, माने देशमुख परिवारातील सदस्य, परिसरातील भाविक ग्रामस्थ यांनी भंडारा उत्सवात सहभाग नोंदवून दर्शनाचा लाभ घेतला.
देवीचा छबिना
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मंदिरातील आरती होऊन दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ग्रामप्रदक्षिणे करिता देवीच्या छबिन्यास सुरुवात झाली. अत्यंत जल्लोषामध्ये देवीच्या छबिन्याने भंडारा यात्रेचा समारोप झाला.



0 टिप्पण्या