💢 "उत्पादन खर्च कमी करून उच्च प्रत साखर निर्मितीसाठी अत्याधुनीकरणाचा निर्णय" - जयसिंह मोहिते पाटील 🟣 "सहकारमहर्षि" 66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

 

💢 "उत्पादन खर्च कमी करून उच्च प्रत साखर निर्मितीसाठी अत्याधुनीकरणाचा निर्णय" - जयसिंह मोहिते पाटील

🟣 "सहकारमहर्षि" 66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 14/8/2026 :

सध्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी उत्पादन खर्च कमी करून उच्च प्रतीची साखर निर्मितीसाठी कारखान्याकडे असलेल्या मशिनरीचे अत्याधुनीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे  अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ६६ व्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थाना वरून  सभेला संबोधित करताना  ते बोलत होते. 

कारखाना कार्यस्थळावर शुक्रवार दि.14 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषय पटलावरील सर्व विषय सर्वानुमते एक मुखाने मंजूर होऊन सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी विषय वाचन केले. याप्रसंगी विक्रमी ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कारखान्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कारखान्याच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी कारखाना स्थापनेपासूनचा लेखाजोखा मांडताना संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या की आपल्या सहकार महर्षि कारखान्याने 17 वेळा एफ आर पी पेक्षा अधिक रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली आहे तर 11 वेळा सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक दर  ऊस उत्पादकांना दिलेला आहे.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, संचालिका स्वरूपराणी मोहिते पाटील, नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील यांच्यासह आजी व माजी संचालक, कार्यकारी संचालक सुहास यादव व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी सहकार महर्षी व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी वेळोवेळी सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन अमलात आणल्याने त्याचा पुढे फायदा झाला आहे. सध्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी उत्पादन खर्च कमी करून उच्च प्रतीची साखर निर्मितीसाठी कारखान्याकडे असलेल्या मशिनरीची अत्याधुनीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. 

 कारखान्याचे वेळोवेळी विस्तार वाढ, अत्याधुनिकरण केल्याने त्याचा फायदा सभासदांना झाला. कृषी उत्पादन वाढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करीत असून सध्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी कारखान्याचे अत्याधुनिकीकरणाची गरज आहे. आधुनिकरणामुळे उत्पादन खर्च कमी होऊन साखरेची प्रत वाढणार आहे. त्याचबरोबर उपपदार्थातही वाढ होणार असल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या