प.पू. ज्ञानयोगी 108 आचार्य श्री विद्यानंदी महाराज यांचा 41 वा चातुर्मास "इष्टोपदेश वर्षायोग 2026" मंगल कलश स्थापना सोहळा अकलूज मध्ये संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 6/8/2026 : येथील श्री 1008 महावीर दिगंबर जैन मंदिर अकलूज मध्ये प.पू. ज्ञानयोगी 108 आचार्य श्री विद्यानंदी महाराज यांचा 41 वा चातुर्मास "इष्टोपदेश वर्षायोग 2026" मंगल कलश स्थापना सोहळा अत्यंत धार्मिक वातावरणात संपन्न झाला. त्यानिमित्त रविवार दि.2/8/2026 रोजी सकाळी प्रितम महावीर गांधी यांच्या कुटुंबीयांनी ध्वजारोहण व पंचामृत अभिषेक तसेच भक्ताम्बर विधान संपन्न झाले.
दुपारी 2 वाजता कलश स्थापनेचा कार्यक्रम सुरू झाला. मुख्य कलश नवजीवन रतनचंद दोशी परिवार यांच्या हस्ते तर द्वितीय कलश मोहनलाल लीलाचंद गांधी परिवार, तृतीय कलश शांतीलाल हिराचंद चंकेश्वरा परिवार, चतुर्थ कलश मिलिंद ताराचंद गांधी परिवार, पंचम कलश जंबूकुमार नेमचंद दोशी परिवार, यांच्या हस्ते विधिपूर्वक व मोठ्या भक्ती पूर्ण वातावरणात स्थापना झाली.




0 टिप्पण्या