✍️ HAPPY THOUGHTS आनंदी विचार

 


✍️ HAPPY  THOUGHTS आनंदी विचार

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 22/7/2026 :

अतिरेकी विचारांची मूर्ख माणसं ठाम असतात आणि शहाणी माणसं कायम साशंक असतात. हा जगात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे.

अहंकार कधीच सत्य स्विकारत नाही,

विचारांचा प्रभाव मनावर पडतो, मनाचा प्रभाव शरीरावर पडतो, शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडत असतो. म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावेत आणि समाधानी राहावे,

चांगला स्वभाव स्मरणात राहतो. चांगले विचार मार्ग दाखवून दिशा देतात. हसरा चेहरा आपला रुबाब वाढवतो. परंतु हसून केलेले काम आपली ओळख वाढवते.

मी आहे म्हणून सगळे आहेत. या ऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही. जीवन जगण्याची मजा येईल,

माणसाचे अश्रू सांगतात तुम्हाला दु:ख किती आहे. संस्कार सांगतात कुटुंब कसं आहे. गर्व सांगतो पैसा किती आहे. भाषा सांगते माणुस कसा आहे. ठोकर सांगते लक्ष किती आहे. आणि सर्वात महत्त्वाचे वेळ सांगते नातं कसं आहे,

कोट्यवधी रुपयांची दौलत देऊन ही सुखाचा एक क्षण बाजारात मिळत नसतो. त्यासाठी संपत्ती नाही तर माणसं आणि माणुसकी कमवावी लागते.

नातं नावाचं जहाज तरंगत ठेवण्यासाठी, मन सुद्धा अथांग समुद्रा सारखं असावं लागतं.

वेदांचा अभ्यास करणं खुप सोपं आहे. परंतु ज्यादिवशी आपण दुस-याच्या वेदनांचा अभ्यास करू त्यादिवशी ईश्वर भेटला असे समजा,

  प्रा. एस. एम. पाटील 

देगाव, तालुका पारोळा (जळगाव )    

  संकलन : प्रविण सरवदे, कराड,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या