✍️ HAPPY THOUGHTS आनंदी विचार
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 30/7/2026 :
एक चिनी म्हण आहे, "शहाणा माणूस चंद्राकडे बोट दाखवतो तेव्हा मुर्ख माणसे चंद्राऐवजी बोटाकडेच बघत राहतात." म्हणून बोट बघू नका, चंद्र बघा.
काम असे करा की नाव होईल आणि नाव असे कमवा की ऐकताच काम होईल,
दुरावा कोणतंही नातं संपवत नाही आणि जवळीक कोणतंही नातं घट्ट करत नाही. तर नात्यांची घेतलेली काळजी आणि केलेला सन्मान यामुळे नातं अधिक मजबूत होतं आणि टिकतं देखील.
पंगतीमधे मीठ वाढणारा पुन्हा मीठ वाढायला येत नाही. तसेच काही लोक असेच मीठासारखे असतात. प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने कदाचित काही फरक पडणार नाही. पण त्यांच्या नसण्याने खुप फरक पडतो. त्यामुळे तुमच्यासाठी महत्त्वाच्या वाटणाऱ्या लोकांना जपा. कारण आयुष्याच्या पंगतीमधे ते कदाचित पुन्हा येणार नाहीत.
जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं,
स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहिलेलं कधीही चांगलं.
संकटातुन वाचल्याशिवाय जिवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्या शिवाय श्वासाची किंमत समजत नाही.
राग, क्रोधावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे मौन, विनय. संयमाचा त्याग केला की क्रोधाचा जन्म होतो. नम्रतेच्या उंचीला माप नसते. ज्याने क्रोध जिंकला त्याने सर्व जग जिंकले असे समजावे,
✍️ प्रा. एस. एम. पाटील
देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)
✒️संकलन : प्रविण सरवदे, कराड,

0 टिप्पण्या