बॉम्बे ब्लड ग्रुप तासगावमुळे मध्य प्रदेशमधील रुग्णांला जीवनदान

 


बॉम्बे ब्लड ग्रुप तासगावमुळे मध्य प्रदेशमधील रुग्णांला जीवनदान

वृत्त एकसत्ता न्यूज

सांगली / प्रतिनिधी दि.13/7/2026 : 

माणुसकीच्या नात्याने जोडलेली रक्तदानाची साखळी किती मोठे कार्य करू शकते, याचे हृदयस्पर्शी उदाहरण तासगाव येथील बॉम्बे ब्लड ग्रुप यांनी दाखवून दिले आहे. मध्य प्रदेश मधील शाहडोल येथील रुग्णाला शस्त्रक्रियेच्या वेळी  ऐ पॉझिटिव्ह या रक्तगटाची गरज निर्माण झाली होती.  शाहडोल शासकीय रुग्णालयात तातडीचे दोन युनिट रक्ताची तातडीची गरज होती. पण त्या ठिकाणी उपल्बध रक्तपेढीत रक्त उपलब्ध नव्हते. आर्थिक परिस्थिती हलाखीचे असलेल्या कुटुंबसमोर मोठे संकट उभे होते. मात्र तासगाव मधून सुरू झालेल्या बॉम्बे ब्लड ग्रुप मुदतीच्या साखळीमुळे त्या रुग्णाला वेळेत रक्त उपलब्ध झाले आणि त्यांच्या उपचारांना मोठा दिलासा मिळाला. 

       मध्यप्रदेश शाहडोल मधील रामकली महाला या रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी शाहडोल येथील शासकीय रुग्णालयात  दाखल करण्यात आले.  शस्त्रक्रियेपूर्वी दोन बॅग रक्ताची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  संबंधित रूग्ण हा तासगांव येथील उंद्योजक विनय जिरगे यांच्याकडे कामाला होता. तो कामा निमित्ताने गावी गेला होता. त्यावेळी  शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता निर्माण झाली. पण रक्त उपलब्ध होईना. रक्ताची व्यवस्था कशी करावी या चिंतेत असलेल्या रुग्णाच्या बहिणीने   तासगाव ( महाराष्ट्र)  मधील उद्योजक विनय जिरगे यांना फोनवरून हकीगत सांगितली.  विनय जिरगे यांनी तासगाव मधील बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया अध्यक्ष विक्रम विश्रांत यादव यांना माहिती दिली. विक्रम यादव यांनी बॉम्बे ब्लड ग्रुप ऑल इंडिया रक्तदान चळवळ तयार केली आहे. त्यामधील रक्तदान क्षेत्रातील "माँ करणी रक्तदान सेवा समिती अध्यक्ष भानु प्रतापसिंह चौहान"  यांना याची माहिती दिली. भानू चौहान मध्य प्रदेश यांनी त्यांच्या विभागातील रक्तदाते पुष्पेंद्रसिंह गहरवार, राजकमल सिंह सेगर यांना कॉल करताच. दोन्ही रक्तदाते त्यांनी वेळ वाया न घालवता रक्तदान केले.

अशा प्रकारे आवश्यक रक्ताची व्यवस्था वेळेत झाल्याने शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला. 

       तासगाव सारख्या तालुक्यातून कार्यरत असलेली बॉम्बे ब्लड ग्रुप आज राज्याच्या सीमा ओलांडून देशभरातील गरजू रुग्णासाठी मदतीचा आधार बनत असल्याचे  या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. एका फोनवर मध्यप्रदेश मध्ये रक्ताची व्यवस्था करून एका रुग्णासाठी जीवनदान मिळवून देण्यात बॉम्बे ब्लड ग्रुप ने महत्वाची भूमिका बजावली .

गेल्या अनेक वर्षापासून बॉम्बे ब्लड ग्रुप नि: स्वार्थ भावनेने हजारो गरजू रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देत आहे. रक्तदान हीच सर्वोच्च मानवसेवा या भावनेतून कार्य करणाऱ्या या संघटनेचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. एका छोट्याशा तालुक्या मधून सुरू झालेला हा माणुसकीचा प्रवास आज अनेकांच्या जीवनात आशेचा किरण  ठरत असून "रक्तदान जीवनदान"हा संदेश पुन्हा अधोरेखित झाला आहे .

या रक्तदानाच्या मदत कामात बॉम्बे ब्लड ग्रुप महेश चौगुले अंकलखोप, तानाजी जाधव, शब्बीर मुल्ला तासगाव,  शंकर कांबळे अलकुड एस, यांचे सहकार्य लाभले.

अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक तथा सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे (संग्रामनगर - अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) यांनी "बॉम्बे ब्लड ग्रुप  ऑर्गनायझर इंडिया" अध्यक्ष विक्रम विश्रांत यादव यांचे भ्रमणध्वनी वरून कौतुक व अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या