जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुप

 


जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुप 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 21/7/2026 :

कराड सैदापूर येथील पंधरा वर्षीय विद्यार्थी विराज जाधव या विद्यार्थ्यास हाताची दुखापत झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रक्ताची गरज लागली. परंतु विराज जाधव याचा रक्तगट जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट "बॉम्बे ब्लड ग्रुप" कोणत्याही ब्लड बँकेमध्ये नसते व ह्या रक्तगटाचे रक्तदाते मिळणे फार खूप कठीण आहे. भारतामध्ये 180 तर जगामध्ये 240 लोकांचा हा रक्तगट आहे. कराड, सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली व इतर जिल्ह्यांमध्ये ह्या ब्लड ची पाहणी केली ती कोणत्याही ब्लड बँकेमध्ये शिल्लक नव्हते हे पाहिल्यानंतर सोशल मीडियाचा वापर केल्यानंतर तो मेसेज 

तासगाव येथील बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया संस्थापक अध्यक्ष विक्रम विश्रांत यादव यांना मिळतात त्यांनी विराज जाधव यांची पूर्ण माहिती घेतल्यानंतर सदर ब्लड हे कोणत्या राज्यात आहे का पाहण्यात आले. कोणतेही राज्यात शिल्लक नसलेल्या कारणामुळे बॉम्बे ब्लड ग्रुप वरती हा मेसेज देण्यात आला. बॉम्बे ब्लड ग्रुप मध्ये जगातील सर्व रक्तदात्यांचा व्हाट्सअप ग्रुप तयार केला असून त्या ग्रुप मधील श्री विनय कुलकर्णी यांनी हा मेसेज पाहिल्यानंतर विनय कुलकर्णी यांनी सर्व काम बाजूला सोडून पंधरा वर्षीय मुलासाठी सर्वप्रथम हॉस्पिटलला जाऊन रक्तदान केले. वेळेत रक्त मिळाल्यामुळे विराज जाधव यांच्यावर वेळेत उपचार झाले. 

विराज जाधव यांच्या पालकांनी व हॉस्पिटल स्टॉप यांनी  विनय कुलकर्णी, विक्रम यादव, व बॉम्बे ब्लड ग्रुप टीम यांचे आभार मानले. 

विनय कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे कि, "जर कोणताही ब्लड ग्रुप जर उपलब्ध नसेल तरी बॉम्बे ब्लड ग्रुप हेल्पलाइन नंबर 9970018001 

या नंबर वरती संपर्क साधल्यास बॉम्बे ब्लड ग्रुप टीम आपल्या सेवेसाठी नेहमी तत्पर असेल"

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या