मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 21/7/2026 :
आपल्याकडे पूर्वजन्म, पुनर्जन्म यांवर अनेक लोकांचा विश्वास आहे. मागच्या जन्मातील घटना, प्रसंग किंवा ठिकाण आठवल्याची काही उदाहरणे आपण ऐकतो.
एखाद्या अपघातातून थोडक्यात बचावलो, दुर्धर आजारातून बरे झालो किंवा नैसर्गिक आपत्तीतून वाचलो तर आपण 'पुनर्जन्म झाला' असे म्हणतो. हा शरीराचा नवा जन्म समजला जातो.
त्याचप्रमाणे एखाद्या अनुभवाने स्वभाव बदलणे, नकारात्मक विचार जाऊन स्वभावात सकारात्मक विचार येणे, त्यामुळे वर्तन बदलणे आणि आहे ही व्यक्ती स्वभावाने पूर्वीची न राहणे, हा सुद्धा एक प्रकारचा पुनर्जन्मच म्हणावा लागेल.
आजचा संकल्प
आपल्या स्वभावात सकारात्मक बदल केले, तर विचारांनी व संस्कारांनी युक्त स्वभाव म्हणजे याच आयुष्यात नवा जन्म नक्की होतो हे लक्षात घेऊ व स्वतःमध्ये चांगला बदल घडवू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या